क्राईम रिपोर्टर मार्था भोसले,कोल्हापूर/प्रतिनिधी :
दिनांक-04/03/2022 रोजी पहाटे 03.30 ते 4.30 वाजण्याचे दरम्यान
तक्रारदार अमोल रमेश नष्टे वय-40, व्यवसाय खाजगी नोकरी, राहणार कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग हे कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक येथे झोपले असता एका अज्ञात इसमाने त्यांची बॅग चोरुन नेली. बॅगेमध्ये 1) सोन्याची 3 ग्रॅम वजनाची अंगठी, 2) रेडमी कंपनीचा मोबाईल हॅण्डसेट असा एकूण 15,000/-रुपयाची मालमत्ता चोरीस गेलर होती. त्या संदर्भाने शाहूपुरी पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचे तपास कामी शाहूपुरी पोलीस ठाणेचे मा.पोलीस निरीक्षक राजेश गवळीसो यांनी गुन्हे शोध पथकास आरोपींचा तात्काळ शोध घेण्याबाबत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांनी मध्यवर्ती बसस्थानावरील सीसीटीव्हीफु टेजच्या अधारे गुन्हा दाखल झाल्यानंतर 24 तासामध्ये शोध घेवून गुन्हे शोध पथकातील पो.अंमलदार शुभम संकपाळ यांचे गोपणीय बातमीदारा मार्फत प्राप्त बातमी प्रमाणे आरोपी सोहेल रियाज बारसकरव य-32,
राहणार सावकार गल्ली मज्जीद जवळ, इस्लामपुर, ता.वाळवा, जिल्हा सांगली यास ताबेत घेवून त्याचेकडे कसून तपास करता त्याने गुन्हयाची कबुली दिली. नमुद आरोपीकडून गुन्हयातील चोरीस गेली मालमत्ता 1) सोन्याची 3 ग्रॅम वजनाची अंगठी, 2) रेडमी कंपनीचा मोबाईल हॅण्डसेट असा एकूण 15,000/- रुपयाची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयाचा तपास मा.पोलीस अधीक्षक सो। बलकवडे साहेब, मा.अपर पोलीस अधीक्षक सो काकडे साहेब, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी सो मंगेश चव्हाण साहेब व पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकातील पोलीस उप निरीक्षक योगेश पाटील, ऋषीकेश पवार, मिलींद बांगर,युवराज पाटील, सागर माने, शुभम संकपाळ, दिग्वीजय चौगले, लखन पाटील व शुशील सावंत अशांनी केला आहे.