घरफाळा वसुली बाबत मनपा प्रशासन पालकमंत्र्यांचा सामोर लाचार : माजी महापौर सुनील कदम..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : घरफाळा वसुली बाबत कोल्हापूर महानगरपालिका प्रशासकांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप माजी महापौर सुनील कदम व सत्यजीत कदम यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.

कोरोना महामारी मुळे अगोदरच आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या सर्वसामान्य मालमत्ताधारकांना किंचितही सूट देण्याबाबत कमालीचे आग्रही असणाऱ्या प्रशासकांनी पालकमंत्री सतीश पाटील यांचे पंचतारांकित हॉटेल मॉल बँक खाजगी इमारती इतर मालमत्ता घरफाळा स्वरूपी ३० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या वसुलीच्या बाबतीत सोयीस्कररित्या दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.

Advertisements

यावेळी बोलताना कदम म्हणाले मी व माझा बंधू माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी कागदोपत्री पुराव्यांसह पालक मंत्री सतेज पाटील यांची ३० कोटी रुपयांहून अधिक कर चुकवेगिरी महापालिका प्रशासकांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

त्यातील नगण्य रक्कम वसूल झाली आहे. याबाबतीतही गेली दीड वर्षे पाठपुरावा करता आलो आहोत.

पण प्रशासक व महापालिका पालकमंत्र्यांकडून हि दंडाची रक्कम वसूल करण्याच्या बाबतीत अपयशी ठरली आहे. याउलट कोरोना महामारी मुळे आर्थिक दृष्ट्या संकटात सापडलेल्या सर्वसामान्य मालमत्ताधारकांना कर वसुली बाबत महापालिका व प्रशासक यांची कठोर भूमिका अनाकलनीय आहे. सर्वसामान्यांवर कारवाईचा बडगा आणि धनदांडग्यांना समोर सोयीस्कर दुर्लक्ष वाडगा. ही प्रशासकांची भूमिका पालकमंत्र्यांचा मोर प्रशासक लाचार झाल्याचे दिसून आले आहे. हरभरा वसुलीसाठी गोरगरिबांना वेठीस धरत, प्रसंगी जप्ती सारखी कारवाई करण्याचा प्रशासकांचा आदेश याची प्रचिती देनारा आहे असा आरोप यावेळी बोलतांना सुनिल कदम यांनी केला. पालकमंत्र्यांनी त्यांची नैतिकता असल्यास त्यांच्या थकित घरफळ्याची रक्कम दंडा सहित भरून आपली नैतिकता सिद्ध करावी असे आवाहन सुनिल कदम यांनी ह्यावेळी केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *