कोल्हापूर उत्तर विधानसभा(२७६) मतदार संघ क्षेत्रामध्ये आजपासून आचारसंहिता लागू …!

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क

कोल्हापूर, दि.१२ कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्याने या रिक्त जागेवर पोटनिवडणूक घेतली जाणार होती. कोल्हापूरकरांना अनेक दिवसांपासून या पोटनिवडणुकीची उत्सुकता लागून राहिली होती. अखेर आज राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक कार्यक्रम तारखा जाहीर केल्या.

Advertisements

१२ एप्रिल रोजी मतदान होणार असून १६ एप्रिल रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात येणार आहे. या मतदार संघात आचारसंहितेची कडक अंमल बजावणी करण्यात येणार आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे तत्कालीन आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे या मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती.

आज केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघासाठी निवडणुकीची अधिसूचना- १७ मार्चला जाहीर होणार आहे.

अर्ज भरण्याची मुदत-दि. १७ मार्च ते २४ मार्च २०२२ आहे.

अर्जांची छाननी- २५ मार्च रोजी करण्यात येणार आहे.

उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख- २८ मार्च आहे.

पोटनिवडणुकीसाठी मतदान- १२ एप्रिल रोजी होणार आहे.

मतमोजणी- १६ एप्रिल रोजी होणार आहे.

२७६ -कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे मतदार संघ क्षेत्रामध्ये आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *