उद्या पासून दहावीची परीक्षा…..!

Media Control Online 

दहावीची परीक्षा मंगळवार १५ मार्चपासून सुरू होत आहे.. दहावीच्या विद्यार्थ्यांचे केंद्र त्यांची शाळाच असल्याने या ठिकाणी परीक्षेच्या एक तास आधी पोहोचण्याचे आवाहन

Advertisements

गेल्या वर्षी करोनाच्या प्रादुर्भावामुळे पडलेल्या खंडानंतर यंदा दहावीची परीक्षा पुन्हा होऊ घातली आहे. मंगळवारपासून (१५ मार्च) या परीक्षांना सुरुवात होणार असून, त्यासाठीची सर्व तयारी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून पूर्ण झाली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी अडचणी येऊ नयेत, म्हणून ‘शाळा तेथे केंद्र’ अशी योजनाही आखली आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा पहिला टप्पा म्हणून गणल्या जाणाऱ्या या परीक्षेच्या तयारीचा घेतलेला आढावा….

परीक्षेसाठी तासभर आधी पोहोचा

दहावीच्या विद्यार्थ्यांचे केंद्र त्यांची शाळाच असल्याने या ठिकाणी परीक्षेच्या एक तास आधी पोहोचण्याचे आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची गर्दी टाळण्यासाठी, थर्मल स्कॅनिंग करण्यासाठी आणि सॅनिटायजरसारख्या सुविधा देण्यासाठी विद्यार्थ्यांनी लवकर परीक्षास्थळी पोहोचावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

अर्धा तास ज्यादा वेळ

यंदा बारावीप्रमाणेच दहावीच्या विद्यार्थ्यांनाही पेपर लिहिण्यासाठी ज्यादा वेळ देण्यात आला आहे. ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी अर्धा तास; तर ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी वीस मिनिटे देण्यात येणार आहेत. यामुळे सकाळच्या सत्राचा पेपर १०.३० वाजता; तर दुपारच्या सत्राचा पेपर ३ वाजता सुरू होणार आहे. पेपर सुरू होण्यापूर्वी अर्धा तास विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला जाईल. दहा मिनिटे आधी त्यांना प्रश्नपत्रिका मिळतील.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *