Share Now
Media Control Online
झुठी शान के परिंदे ही ज्यादा फडफडाते हैं…! बाझ की उडान मे कभी आवाज नही होती..!! जय महाराष्ट्र..!!!, असे संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांच्या या ट्विटचा नेमका अर्थ काय असावा, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र असली तरी धनंजय महाडिक यांच्या विजयासाठी मतांची जुळवाजुळव केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान पूर्ण झाल्यानंतर मतमोजणीला सुरुवात होईल. ही मतमोजणी संध्याकाळी सात वाजेपर्यंत किंवा त्यापेक्षा उशीरापर्यंत चालेल, असा अंदाज आहे. असा दावा करण्यात आला आहे. मात्र, सहाव्या जागेसाठी दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करावी लागणार, हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे मतमोजणीची प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे.
Share Now