Share Now
Media Control Online
राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी प्रयत्नशील असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांची संधी हुकल्यात जमा आहे. राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे सध्या आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. मतदानाला परवानगी मिळावी, यासाठी दोघांकडून न्यायालयात अर्जही करण्यात आले होते. मात्र, कायदेशीर पेचांमुळे या दोघांनाही राज्यसभेसाठी मतदान करण्याची परवानगी मिळण्याची शक्यता मावळली आहे.
दोन मतं निकालात निघाली; आता अपक्षांवर मदार
देशमुख, मलिक यांची मतं मविआसाठी हक्काची होती. मात्र आता त्यांना मतदान करता येणार नाही. यामुळे मविआचे चौथे उमेदवार असलेल्या संजय पवार यांचं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याकडे असलेली जादा मतं, अपक्ष आणि लहान पक्षांची साथ यामुळे पवारच विजयी होतील, असा विश्वास मविआकडून व्यक्त केला जात आहे.
Share Now