Share Now
Media Control Online
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या १० जागांवरील निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. राज्यसभा निवडणुकीप्रमाणं या निवडणुकीत देखील भाजप आणि महाविकास आघाडीनं शक्ती लावली होती. विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. भाजपनं प्रविण दरेकर,उमा खापरे, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी दिली होती. तर, शिवसेनेनं सचिन अहिर, आमश्या पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेसनं रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे, काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली होती. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे एकूण ११ उमेदवार असल्यानं निवडणूक लागली. भाजपचे प्रविण दरेकर,उमा खापरे, राम शिंदे, श्रीकांत भारतीय यांचा विजय झाला आहे. तर, शिवसेनेचे सचिन अहिर, आमश्या पाडवी विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे विजयी झाले आहेत.
Share Now