विधान परिषद निवडणुक निकाल Live :खडसेंचा वनवास संपला….!

Media Control Online

गेल्या तीन वर्षांपासून राजकीय वनवासात असलेल्या एकनाथ खडसे यांचा वनवास अखेर संपला आहे. विधान परिषद निवडणुकीत त्यांनी पहिल्या क्रमाकांची २७ मतं घेऊन दणदणीत विजय मिळविला आहे. त्यामुळे तीन वर्षानंतर त्यांचा आवाज पुन्हा विधिमंडळात घुमणार आहे. त्यांच्या पराभवासाठी भाजपने मोठ्या प्रयत्नांची शर्थ केली. परंतु राष्ट्रवादीच्या करेक्ट नियोजनाने खडसेंच्या माथी पहिल्याच फेरीत विजयाचा टिळा लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *