पूर बाधित नागरिकांना आवश्यक सेवा-सुविधा देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज: मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण..!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.१५ : मागील महापुराचा अनुभव लक्षात घेऊन यंदाच्या संभाव्य पूरपरिस्थितीसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने बारकाईने नियोजन केले आहे. पूर बाधित नागरिकांना आवश्यक सेवा-सुविधा देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज ..

पूर कालावधीत जिल्ह्यातील ग्रामीण भागात पुरेसा व स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा यासाठी जिल्हा परिषदेमार्फत आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे. 

Advertisements

पुरामुळे स्थलांतरीत कॅम्पमध्ये राहणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत २६७ फिरती वैद्यकीय पथके यात १ हजार ३५ कर्मचारी आरोग्य विभागासाठी नेमली आहेत.

पूरामुळे बाधित होणाऱ्या जनावरांसाठी चारा छावण्यांची सोय करण्यात आली आहे. पुरपरिस्थितीत जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *