औरंगाबादचे नाव आता संभाजीनगर ऐवजी छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…!

MEDIA CONTROL ONLINE  मुंबई/प्रतिनिधी : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आपल्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत घेतलेल्या निर्णयांना नव्याने स्थापन झालेल्या सरकारने स्थगिती दिली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. […]

पेट्रोल ५ रुपये तर डिझेल ३ रुपयेने स्वस्त शिंदे सरकारचा मोठा निर्णय…!

मुंबई/प्रतिनिधी, दि.१४ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे इंधनावरील करात कपात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल ५ रुपये, तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त झाले आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस […]

अन् सतेज पाटील यांच्या साठी एक तरुण पोहचला दिल्ली मध्ये….!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात अनेक राजकीय घडामोडींचा वेग वाढला आहे. यातच काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. याच संबंधित आता एक वेळी बातमी समोर आली आहे. […]

प्रकल्पग्रस्त वसाहतींचा विकासही ताकतीने केला : आमदार हसन मुश्रीफ

कोल्हापूर/प्रतिनिधी,दि.१२ :  कागल विधानसभा मतदारसंघातील गावे, वाड्यावस्त्यांसह प्रकल्पग्रस्त वसाहतींचा विकासही मोठ्या ताकतीने केला, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. धरणांच्या बांधकामासाठी घरेदारे, शेतीवाडी त्याग केलेले प्रकल्पग्रस्तच समृद्धीचे खरे शिल्पकार आहेत, असेही ते म्हणाले.कसबा सांगाव […]

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई/प्रतिनिधी,दि १२: नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे ५० हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत नाही याची दखल घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार नाही याबाबतचा शासन निर्णय त्वरीत […]

सुप्रीम कोर्टातील सुनावणी लांबणीवर : बंडखोरांवरील कारवाईसाठी शिवसेनेला वाट पाहावी लागणार….!

  मुंबई: शिवसेनेविरुद्ध बंड केलेल्या १६ बंडखोर आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईसंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शिवसेनेला या आमदारांवर अपात्रतेची कारवाई कधी होणार, यासाठी वाट पाहावी लागणार आहे. शिवसेनेच्या मागणीनुसार १६ आमदारांना अपात्र […]

इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 विशेष वृत्त कौतुक नागवेकर    पंढरपूर:- इस्कॉनच्या माध्यमातून संपूर्ण विश्वात भगवद्गीतेचा आणि धार्मिक मूल्यांचा प्रसार करण्याचे काम सुरू आहे. मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य केले जाते, असे प्रतिपादन […]

हे सरकार लोकांचं आहे, लोकांच्या हिताचं जपणूक करणार आहे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

MEDIA CONTROL ONLINE एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद (दिल्ली) एकनाथ शिंदे म्हणाले, “आमच्या यंदाच्या दिल्ली दौऱ्यात राष्ट्रपती, गृहमंत्री, संरक्षण मंत्री तसंच भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र […]

मेट्रो आणि बुलेट ट्रेन सारखे प्रकल्प मुंबईला देशाशी जोडण्यासाठी महत्वपूर्ण ठरतील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई/प्रतीनिधी  दि.०८ : महाराष्ट्र हे देशाचे विकास इंजिन कायमच राहिले आहे. महाराष्ट्रात वेगाने विकास होण्याची क्षमता असून उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनामार्फत संपूर्ण प्रोत्साहन दिले जाईल. वेगवेगळया क्षेत्रातील उद्योजकांनी महाराष्ट्रात येण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले […]

खासदार धनंजय महाडिक यांनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ….1

कोल्हापूर प्रतिनिधी : राज्यसभेचे नूतन खासदार धनंजय महाडिक यांनी आज दिल्लीत राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर खासदार महाडिक यांनी, कोल्हापूरसह महाराष्ट्रात विकासाचा अजेंडा राबवला जाईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. खासदार महाडिक यांच्यासह भाजपचे खासदार पियूष गोयल, अनिल बोंडे यांच्यासह २४ जणांचा शपथविधी झाला. तब्बल २४ वर्षांनंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच राज्यसभेसाठी मतदान झाले. अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या खासदारांचा, आज दिल्लीत शपथविधी झाला. भाजपचे खासदार पियूष गोयल, धनंजय महाडिक आणि अनिल बोंडे यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. मंत्री गोयल यांनी हिंदीतून, तर खासदार महाडिक आणि बोंडे यांनी मराठीतून शपथ घेतली. शपथ ग्रहण केल्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरसह महाराष्ट्राच्या विकासासाठी कटिबध्द असल्याचे सांगितले. राज्यसभा निवडणुकीनंतरच राज्यात सत्ता परिवर्तनाला सुरुवात झाली. त्यामुळे राज्यसभेची निवडणूक महत्त्वाची ठरली. यापूर्वी लोकसभेत आपण उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे आता राज्यसभेतही प्रभावी काम करता येईल. विशेषतः शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवण्यावर भर देऊन, राज्यात विकासाचा अजेंडा राबवला जाईल, अशी प्रतिक्रिया खासदार महाडिक यांनी व्यक्त केली. शपथविधी समारंभासाठी भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक, विश्‍वराज महाडिक उपस्थित होते. शपथविधीनंतर महाडिक कुटुंबीयांनी खासदार महाडिक यांना मिठाई भरवून आनंद व्यक्त केला. तर कोल्हापुरात महाडिक युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी बी न्यूज कॉर्नर फटाक्यांची आतषबाजी केली. त्याच वेळी सोशल मीडियातूनही खासदार महाडिक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. दरम्यान लोकसभेत काम करताना खासदार महाडिक यांनी तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळवला होता. आता राज्यसभेत नेतृत्व करतानाही धनंजय महाडिक यांच्याकडून तशीच भक्कम कामगिरी होईल, असा विश्‍वास महाडिक यांच्या