Media Control news network
वैशाख शुक्ल पौर्णिमा—बौद्ध धम्मातील सर्वात पवित्र दिवस. भगवान Gautama Buddha यांच्या जीवनातील जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तिन्ही घटनांची स्मृती जागवणारा हा दिवस केवळ धार्मिक सण नसून, सामाजिक मूल्यांचे पुनरुज्जीवन करणारा क्षण आहे.

१७ एप्रिलपासूनच सुरू झालेल्या वैशाख महिन्याच्या पार्श्वभूमीवर देवदास बानकर कुटुंबाने अनेक वर्षांपासून घरगुती पातळीवर बुद्ध पौर्णिमा साजरी करण्याची परंपरा जपण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या वर्षीही शेवटच्या पाच दिवसांत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी ‘धम्मालय’ परिसरात श्रद्धा आणि संस्कारांचा संगम डवून आणले
शुक्रवारी सायंकाळी उपासिका महिलांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून बोधीवृक्षास जलदान करण्यात आले. त्यानंतर २५७० व्या बुद्ध जयंतीनिमित्त केक कापून सामूहिक त्रिसरण-पंचशील वंदना घेण्यात आली. एकमेकांना मंगलकामना देत सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला.
या प्रसंगी आयुनी पुनम बानकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “बौद्ध म्हणून केवळ ओळख पुरेशी नाही; पुढील पिढीपर्यंत धम्माचे संस्कार पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे.” त्यांच्या या विधानाने उपस्थितांमध्ये आत्मपरीक्षणाची भावना निर्माण झाली.
इतिहासात Ashoka सम्राट अशोकाच्या काळात बौद्ध सण ५ ते १५ दिवस साजरे होत असत. तेव्हा सण हे केवळ उत्सव नव्हते, तर समाजघडणीचे माध्यम होते. आजच्या काळात हीच परंपरा जिवंत ठेवण्याची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते.
परंतु या सणाच्या निमित्ताने एक गंभीर सामाजिक वास्तव समोर येते—
आजची पिढी परंपरेपासून दूर जात आहे का?
धम्मातील सण, विचार आणि आचार यांचा वारसा पुढे नेण्यासाठी आपण कितपत प्रयत्नशील आहोत?
बुद्ध पौर्णिमा हा केवळ आनंदाचा सण नाही, तर मूल्यांची जपणूक, संस्कारांची पेरणी आणि पुढील पिढीला योग्य दिशा देण्याचा संकल्प आहे.
आज प्रत्येक बौद्ध कुटुंबाने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे—
आपण आपल्या मुलांना धम्माचा वारसा देत आहोत का, की तो हरवू देत आहोत?
याच प्रश्नाचे उत्तरच समाजाच्या भवितव्याची दिशा ठरवणार आहे.
बानकर कुटुंबीयांच्या वतीने सालाबादप्रमाणे साजरा करण्यात येणारे सण
बुध्द व सम्राट अशोक कालिन बौध्द धम्मातील सण (बुध्द पौर्णिमा- जयंती धम्म पौर्णिमा- जयंती संघ पौर्णिमा- जयंती सम्राट अशोक अष्टमी धम्म विजया दसमी बुध्द (रथ) उत्सव वर सुजाता पौर्णिमा अन्य पौर्णिमा इत्यादी) घरी साजरे करतात.
