ग्रामस्थांचा खुलासा…आमदार प्रकाश आबीटकर यांच्याबाबत राशिवडेत काहीच घडलेले नाही…!

कोल्हापूर : राशिवडे गावामध्ये आमदार प्रकाश आबीटकर यांनी विकासकामांचा पर्वत उभा केला आहे. गणपती मंडळामध्ये न घडलेला किस्सा रंगवुन विरोधकांनी रचलेले बदनामीचे कुभाड धादांत खोटे असुन आमदारांच्या राशिवडे या हुकमी गावामध्ये विरोधकांची डाळच शिजत नसल्याने बदनामीची केवीलवाणी धडपड केली जात आहे असा खुलासा राशिवडे ग्रामस्थांनी प्रसिद्ध पत्रकाव्दारे केला आहे.

 गावामधील बहुतांशी मंडळांच्या महाआरत्यांना आमदार आबीटकर यांनी उपस्थिती लावली.कार्यकर्त्यांशी हितगुज करत विसर्जन मिरवणुकी बाबतच्या पोलीस प्रशासनाच्या वेळेच्या अडचणी दुर करण्याबाबत प्रशासनाशी चर्चा ही केल्या.परंतु राशिवडे गावामध्ये अन्य कुणाचीच राजकीय डाळ शिजत नसल्याचे काहीतरी बदनामीचे कुभाड रचण्याचे विरोधकांचे काम सुरु आहे. केवळ निवडणुका आल्यावरच मुखवटे दाखविणार्यांना राशिवडेकर योग्य वेळी त्यांची जागा दाखवितील.

Advertisements

विकासकामा मुळेच नव्हे तर प्रत्येकाच्या अडचणी आपुलकीने सोडविण्यामध्ये आबीटकर अग्रेसर असल्याने ते घराघरांमध्ये पोहोचले आहेत.प्रत्येकाच्या तोंडात आबीटकर हेच नाव येऊ लागल्याने आपलं काहीच चालणार नाही हे ओळखुन विरोधकांनी रचारचीचे कारस्थान चालु केले आहे,त्यावर विश्वास ठेवु नये असेही आवाहन यामध्ये केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *