येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजपच महासत्ता असेल : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा….!

कोल्हापूर : येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजपच महासत्ता असेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर येथे आयोजीत संकल्प सभेत व्यक्त केला.

कोल्हापूर मध्ये आज भाजपची विजय संकल्प सभा आयोजित केली आहे या सभेमधून अमित शाह यांनी जनतेला संबोधित केले. या सभेतून अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंचा आणि महाविकास आघाडीचा चांगलाच समाचार घेतला.
अमित शाह म्हणाले
जेव्हा पण मी कोल्हापूरमध्ये येतो महालक्ष्मी देवीचे दर्शन नक्की घेतो कारण आपल्या सगळ्याच्या जीवनामध्ये देवीचा आशीर्वाद गरजेचं आहे आणि जेव्हा जेव्हा मी देवीचा दर्शन घेतो तेव्ह तेव्हा भारतीय जनता पार्टीचा विजय झालेला आहे. अमित शाह पुढे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व उमेदवार निवडून आणणारच

Advertisements

काँग्रेस सरकारच्या काळात सगळेच स्वतःला पंतप्रधान समजत होते असं म्हणत अमित शाह यांनी काँग्रेसला देखील चिमटा काढला आहे. २०१४ मध्ये जो निवडणूकीचा निकाल लागला होता तो ऐतिहासिक होता. सत्तेत येण्यासाठी उद्धव ठाकरे शरद पवारांच्या पायाखाली गेले.
आता महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. गेल्या लोकसभा वेळी ४२ जागांवर विजय मिळवला होता. यावर पक्ष संतुष्ट नाही आता सर्व ४८ जागांवर विजय मिळवून त्या मोदींच्या पदरात टाकण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध होऊया, असे आवाहन शहा यांनी केले. भाजप शिंदे यांची शिवसेना यांनी महाराष्ट्रात पुन्हा वर्चस्व करूया असे आवाहन शहा यांनी केले.

या संकल्प सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर,खासदार संजय मंडलिक खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने, चंद्रशेखर बावनकुळे, आमदार विनय कोरे, अमादर प्रकाश आवाडे समरजितसिंग घाटगे, महेश जाधव, राहुल चिकोडे
यांच्यासह भाजप नेते आणि मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *