राजाराम साखर कारखाना महाडीकाच्याकडे २५ वर्ष आहे आता ५ वर्षासाठी आमच्याकडे द्या : आमदार सतेज पाटील….

कोल्हापूर : छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकित महाडिक विरोध बंटी पाटील यांची निवडणूक नाही तर येलूर विरोधात कोल्हापूरच्या सभासदाची आहे त्यामुळे गेले २५ वर्ष महाडिकाच्या ताब्यात असलेला कारखाना ५ वर्ष माझ्या ताब्यात द्या शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊ असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले ते चोकाक येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते.

 छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आमदार सतेज पाटील यांनी हातकलंगले तालुक्यातील हालोंडी,माले, मुडशिंगी ,चोकाक या गावांमध्ये शेतकरी ऊस उत्पादक सभासदांची संवाद साधला साखर कारखान्याबद्दल अनेक शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या क्षेत्रातील हातकणंगले मधील आमचे सर्वात जास्त सभासद असलेले गाव या गावात पाणंद, किंवा शेतकऱ्यांच्या हिताचा कुठलेही काम झालेले नाही सभासदांना गेले २० वर्ष विचारले नाही मात्र आता निवडणूक जवळ आल्यापासून दररोज भेटी साठी लोक गावात येत आहेत मात्र आम्ही यावेळी परिवर्तन केल्या शिवाय स्वस्त बसणार नसल्याचे मुडशिंगी गावचे जीवनराव शिंदे यांनी सांगितले

Advertisements

 साखर कारखाना मध्ये हुकूमशाही पद्धतीने महाडिक काम करत आहेत व्यापारी म्हणून कोल्हापुरात आले आणि कारखाना ताब्यात घेतला जे सभासद पात्र आहेत ते सांगलीच्या येलूर, तांदुळवाडी ह्या कार्यक्षेत्रातील नाहीत मात्र राजकीय सत्तेचा फायदा घेऊन महाडिक काम करत आहेत मात्र खरे सभासद परिवर्तन करतील असा विश्वास माजी चेअरमन सर्जेराव माने यांनी व्यक्त केला

गेले २५ वर्ष जिल्ह्यातील राजकारण मी करतोय, साखर कारखाना कार्यक्षेत्रातील १२२ गावात सर्व सभासदाशी माझी ओळख निर्माण झाली आहे. कारखान्याच्या गेल्या दोन्ही निवडणूक लढवली आहे, आता जे सभासद राहिले आहेत हे येलूर आणि परिसरातील सभासद आहेत ते राहिले आहेत निवडणूक सोपी झाली असा प्रचार केला जातो मात्र छत्रपती राजाराम साखर कारखान्यात

माझा लढा शेतकऱ्याच्या साठी आहे. त्यामुळे महाडिक विरोध बंटी पाटील यांची निवडणूक नाही तर येलूर विरोधात कोल्हापूर चे सभासदाची आहे त्यामुळे गेले २५ वर्ष महाडिकाच्या ताब्यात कारखाना आहे आता ५ वर्ष माझ्या ताब्यात द्या शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊ असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.

यावेळी माजी सरपंच शशिकांत खवरे,पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत, निलेश पाटील, महेश चव्हाण,सरपंच प्रताप पाटील, डी आर माने प्रशांत शिंदे, सुनिकेत पाटील, योगेश चोकाकाकर,भाऊसो सुतार, गोपाळ निकम, बाळासाहेब कदम, शरद पवार, सचिन पाटील यांच्या सह हालोंडी, माले, मुडशिंगी चोकाक या गावचे ऊस उत्पादक शेतकरी सभासद कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *