Share Now
Read Time:1 Minute, 11 Second
कोल्हापूर : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला राज्याचा अर्थसंकल्प समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देणारा आहे. नाविन्यपूर्ण योजनांची घोषणा करतानाच, त्या योजना पूर्णत्वास जाण्यासाठी पुरेशा निधीची तरतुद केली आहे. शेतकर्यांच्या सन्मान निधीत भरघोस वाढ, महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेची मर्यादा वाढवणे, शिक्षक आणि आशा कर्मचार्यांच्या मानधनात वाढ, दळणवळणासाठी चालना, कृषी उत्पादनांसाठी ठोस योजना, कोल्हापूरी चप्पलसाठी क्लस्टर, एक रूपयात पीक विमा योजना, महिलांना ५० टक्के दरात एस टी प्रवास अशा योजना तर क्रांतीकारी आहेत. महाराष्ट्राला गतीमान प्रगती देण्यासाठी यंदाचा अर्थसंकल्प अत्यंत महत्वाचा आणि अभिनंदनीय आहे.
Share Now