…..पण लक्ष कोण देतोय?

दिपक भगत रायगड जिल्हा प्रतिनिधी 

रायगड : प्रदुषणाच्या विळख्यात अडकलेली धाटाव औद्योगिक वसाहत हि नेहमीच चर्चेचा विषय झालेली आहे.अनेक वेळा ग्रामस्थ,कामगार,नागरीक यांनी वेळोवेळी प्रदुषणाविरोधात आवाज उठवून देखील नेहमीच संबधीत अधिकार्यांनी स्थानिकांच्या या आवाजाला केराची टोपली दाखवण्याची काम केलेल आहे.एखादी बाब निदर्शनांस आणुन दिली तरी केवळ वेळकाडुपणा करण्यापलीकडे काहीच कारवाई होत नसल्याच दिसून येत असल्याची खंत नेहमी स्थानिकांकडुन व्यक्त केली जात असते.

Advertisements

     असाच काहीसा अनुभव युवा पत्रकार संघाचे तालुका प्रतिनीधी यांना आला.अन्सुल कंपणीच्या बाजूला साचलेला प्रदषित पाण्याचा पंपाद्वारे चेंबरमध्ये उपसा होत असल्याच दिसून येताच याबाबत संबधित कामगारांना विचारल असत त्यांनी कोणतच उत्तर न देता तेथून निघुन जाण्याचा काम केला.याचा पाठपुरावा करीत असताना अन्सुल कंपणीच्या प्रशासनाने ते प्रदूषित पाणी आमच नाहि याबाबत तुम्ही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क करा.कारण पाणीव्यवस्थाचे विषय हा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ उपविभागीय रोहा यांच्या आखात्यारितला असुन बर्याच कंपण्यानी यापूर्वी त्यांच्याशी पत्रव्यवहार केला मिटिंग केल्या परंतु एवढे करुनदेखील विषेश हाती काहि न लागल्याच बोलला जात आहे.

    कंपनीच्या बाजूला साचलेल्या पाण्याच नियोजन करण्याची जबाबदारी संबधित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ उपविभागीय कार्यालयाची असताना दुर्लक्ष करुन हि परिस्थिती आणखी चिघळवण्याच काम केल जात आहे.प्रदूषित पाणी पंपाद्वारे चेंबरमध्ये टाकून केलेली उपाययोजना हि तात्पुरती मलपट्टी असुन येणार्या पावसाळ्यात हे पाणी नदीच्या पात्रात जावुन प्राणी,पशु-पक्षी,शेती,यांना धोका निर्माण होऊ शकतो तसेच आजुबाजुच्या गावात या पाण्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका होण्याचीहि शक्यता नाकारता येत नाहि.आजुबाजुच्या कंपण्यानी,स्थानिकांनी व ईतर सेवाभावी कार्यकर्त्यांनी पत्रव्यवहार करुन हि बाब वारंवार निदर्शनास आणुनहि परिस्थिती “जैसे थे” तशीच राहिलेली आहे.हि परिस्थिती आटोक्यात आली नाहि तर येत्या काळात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ उपविभागीय अधिकार्यांच्या गलथान कारभारा विरोधात स्थानिकांचा उद्रेक नक्कीच पहायला मिळेल.हि परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी संबधित कार्यालासोबत पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन युवा पत्रकार संघाचे रायगड जिल्हाध्यक्ष दिपक भगत यांनी केल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *