सुचिता घोरपडे यांच्या कोल्हापुरी बोलीतील कथेचा ‘माझी बोली माझी कथा’ या  कथासंग्रहात समावेश….!

मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश जी बैस यांच्या हस्ते डॉ. मोनिका ठक्कर यांचे ‘माझी बोली माझी कथा’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी दि.४ एप्रिल रोजी मुंबईतील राजभवन करण्यात आले. 

आपल्या महाराष्ट्रात मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या विविध बोली भाषा बोलल्या जातात, हल्ल्या त्या सर्व भाषा नामशेष होत आहेत. याचा विचार करून बोलींचे जतन आणि संवर्धन व्हावे या दृष्टीने तसेच वाचकांना ते रंजक वाटावे या उद्देशाने आणि आपल्या महाराष्ट्रात बोलल्या जाणार्‍या बोली याचे ज्ञान जनसामान्य, महाविद्यालय व विद्यालय स्तरावरही विद्यार्थ्यांना मिळावे, बोलींच्या अभ्यासाकडे कल वाढावा या हेतूने महाराष्ट्रातील विविध बोलीतील कथा संकलित करून सोबतच त्याचा कथासार, कठीण शब्दांचे अर्थ, त्या-त्या बोली विषयी अभ्यासपूर्ण माहिती तसेच लेखकांचा थोडक्यात परिचय अशा धाटणीचा हा ग्रंथ आहे. सदर ग्रंथात ५७ बोलीतील ५७ कथा असून प्रत्येक कथा त्या-त्या बोलीतील अभ्यासक लेखकांनी लिहिल्या आहेत. दिग्गज लेखक मंडळींनी या ग्रंथाला आपले योगदान देऊन समृद्ध केले आहे. या पुस्तकात सुचिता घोरपडे यांच्या कोल्हापुरी बोलीतील ‘झटाझोंब्या’ कथेचाही समावेश आहे. 

Advertisements

बोलीविषयक असा प्रयोग महाराष्ट्रात प्रथमच या ग्रंथाच्या रूपाने झाला आहे. माझी बोली, माझी कथा’ असे या ग्रंथाचे नाव असून, या ग्रंथाचे प्रकाशन लोकायन प्रकाशन संस्था यांनी केले आहे.आजवर संशोधनात्मक लेखन आणि संपादन केलेल्या १२ ग्रंथांचा अनुभव पाठीशी घेऊन महाराष्ट्रातील विविध बोलीतील सदर अभ्यासपूर्ण ग्रंथाचे संकलन, संपादन आणि समन्वयाची भूमिका डॉ. मोनिका ठक्कर यांनी सांभाळली आहे. 

 महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मुंबईतील राजभवन येथे या ग्रंथाचे प्रकाशन संपन्न झाले. त्या प्रसंगी प्रत्येक प्रांतात बोली या विषयी अभ्यास होणे गरजेचे आहे आणि ते ग्रंथ स्वरुपात असल्यास ते पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरेल आणि आपल्या मातृभाषेचा सार्थ अभिमान आपण बाळगायला हवा असे प्रतिपादन करून या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांनी डॉ. मोनिका ठक्कर यांचे विशेष कौतुक केले. या प्रसंगी प्रकाशन संस्थेचे सदस्य उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *