भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा हा नेहमीच वचननामा असतो.
खासदार धनंजय महाडिक

 media control news network

भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा हा नेहमीच वचननामा असतो. गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने, देशाचा चेहरा मोहरा आणि प्रतिमा सुद्धा बदलली आहे. आज जाहीर झालेल्या जाहीरनाम्यातून समाजातील प्रत्येक घटकाचा विचार केला आहे. बलशाली भारत- विकसित भारत घडवण्यासाठी भाजप सरकार कटिबद्ध आहे आणि त्याचे प्रतिबिंब आजच्या जाहीरनाम्यात उतरले आहे. सर्वसमावेशक आणि देशाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन बनवलेला हा जाहीरनामा म्हणजे सामर्थ्यशील आणि विकसित भारताची सुरुवात आहे. अब की बार, चारसो पार ही घोषणा सत्यात येणार असून, जागतिक पातळीवर महासत्ता बनण्यासाठी सारे देशवासीय या जाहीरनाम्यातून एकवटले आहेत.

भाजपा, खासदार धनंजय महाडिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *