इचलकरंजीतील दोन माजी सभापतींचा विकास कामावरून वाद

पुष्पा पाटील/कोल्हापूर : माझ्या प्रभागात का आलास असा जाब विचारल्याच्या कारणावरुन इचलकरंजीतील दोन माजी पाणी पुरवठा सभापतींच्यामध्ये सोमवारी जोरदार वादावादी झाली. यामध्ये काही नेतेमंडळींनी मध्यस्थी करत वादावर पडदा टाकला.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, शांतीनगर परिसरातील जाधव मळा, लाखेनगर भागात अनेक दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने भागातील महिलांनी गावभागातील एका माजी पाणी पुरवठा सभापतीची भेट घेऊन समस्या सांगितल्या. त्यानंतर त्या माजी सभापतीने जाधवमळा-लाखेनगर परिसरात येऊन तेथील समस्या जाणून घेण्यास सुरुवात केली.
याची माहिती मिळताच याच भागातील दुसरा माजी पाणी पुरवठा सभापती त्याठिकाणी आला.त्याने तू येथे का आलास, हा भाग माझा आहे. मी तेथील समस्या बघतो , अशी बोलणी सुरु केली. त्यावर, समस्या सुटत नसल्याने नागरिक माझ्याकडे आले आहेत. समस्या सोडविण्यासाठीच मी आलो असल्याचे प्रत्युत्तर दिले. शब्दाला शब्द वाढत गेला. त्यातूनच जोरदार वाद सुरु झाला . यावेळी घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या वादाची शहरात जोरदार चर्चा रंगली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *