शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कैफियत यात्रेला सुरुवात..

कोल्हापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून कैफियत यात्रेला सुरुवात झाली आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हि पदयात्रा होणार आहे. कागल ते कोल्हापूरपर्यंत ही यात्रा असणार आहे.शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे 100 व 50 रुपयाचा दुसरा हप्ता देण्याची राज्य सरकार व साखर कारखानदारांना सद्बुध्दी मिळावी. तसेच शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा, यासाठी शाहू महाराजांचे जनकस्थळ कागल ते समाधिस्थळ कोल्हापूर पर्यंत कैफियत पदयात्रेस आज सुरुवात झाली आहे.

यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले सरकारनं आम्हाला दिलेला शब्द पाळला नाहीय. मागच्या वर्षी तुटलेल्या उसाची एफआरपी अधिक मिळावी अशी शेतकऱयांची मागणी होती त्यासाठी आम्ही महामार्ग देखील रोखला होता . ज्या कारखान्याने तीन हजार रुपये दिले त्यांनी जादा पन्नास रुपये शेतकऱ्यांना द्यायचे असं ठरलं देखील होत. परंतु राज्य सरकारने याला परवानगी न दिल्याने शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. आता आम्ही सरकारला पुन्हा जागे करू..

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *