Kolhapur News : पर्यटनासाठी आले, आणि नदीच्या प्रवाहात वाहून गेले

Kolhapur News : कोल्हापुरात नदीच्या प्रवाहात दोन तरुण वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेश कदम आणि प्रतीक पाटील दोघेही निपाणी येथील रहिवासी असून पर्यटनासाठी ते काळम्मावाडीला आले होते.
अधिक मिळालेली माहिती अशी कि बेळगाव मधील निपाणी येथील 13 जण पर्यटनासाठी राधानगरी येथे आले होते. आज दुपारच्या वेळी काळम्मावाडी धरण परिसरातील दूधगंगा नदी येथे गणेश कदम हा तरुण पोहता येत नसताना दूधगंगा नदीच्या डोहात उतरला. त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो डोहात बुडू लागला यावेळी तो बुडत आहे हे समजताच त्याचा मित्र प्रतीक हा त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरला मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तोही पाण्याचा प्रवाहात वाहून गेला. नदीला प्रवाह मोठा असल्याने या प्रवाहातून दोघांना बाहेर पडणे अशक्य झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *