मास्कमुक्त महाराष्ट्राबाबत कोणतीही चर्चा झाली नाही: उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई/प्रतिनिधी : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्कमुक्त महाराष्ट्राबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. मास्क  बंधनकारक आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी आज शनिवारी पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर ही माहिती दिली.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्राला मास्कमुक्‍त करण्यावर चर्चा झाली असल्याची माहिती पुढे आली होती. यावर अजित पवार यांनी खुलासा केला आहे. मास्कबाबत चर्चा झाली नाही. काल काही चॅनेलवर बातम्या चाललेल्या. पण तसे काही नाही. मास्क वापरायलाच हवा, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisements

       

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *