शाहीरी पंरपरेला मोठा इतिहास : जिल्हाधिकारी राहूल रेखावार

कोल्हापूर/प्रतिनिधी,दि २३ : जगभरात ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. अनेक कलाकार या मातीत घडले. आपल्या कलेतून अनेक कलाकारांनी कोल्हापूरचा नावलौकिक केला .यात शाहिरांची मोठी भूमिका आहे.चळवळीतील शाहिरांनी शिव, शाहू,फुले, फुले आंबेडकर विचार पोवाड्यातून समाजापुढे पोहोचवण्याचे काम केले.शाहिरी परंपरेला एक मोठा इतिहास आणि समृद्ध वारसा लाभला आहे .असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केले .

      छत्रपती शिवाजीराजे चौकामध्ये शनिवारी सायंकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घघाटन आनंद गिरी यांच्या हस्ते करण्यात आले.

Advertisements

शाहिरी परंपरा छ.शिवाजी महाराजांच्या काळा पासून चालत आली असून ती अजूनही जिवंत आहे. छ.शाहू महाराजांच्या काळात अनेक शाहिरांना स्वतः शाहू महाराजांनी प्रोत्साहन दिले. ही कला चिरकाल टिकावी यासाठी मोठी मदत केली. त्यामुळे अनेक शाहीर घडले . छ .शाहू महाराज शताब्दी वर्ष कृतज्ञता पर्वानिमित्त शाहिरी संघटनेने विविध ठिकाणी पोवाडा कार्यक्रमाच्या माध्यमातून छ.शाहू महाराज यांना आदरांजली वाहून अभिवादन केले.शिवशाहीर दिलीप सावंत, शाहीर संजय गुरव, शाहीर रंगराव पाटील यांनी त्यांच्या वीरश्री पोवाड्यातून शाहू महाराजांचा इतिहास, त्यांचे कार्य समाजापुढे उलगडण्याचा प्रयत्न केला .याला नागरिकांकडून उंदड प्रतिसाद मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *