निवडणूक राज्यसभेची : यशोमती ठाकूर आणि जितेंद्र आव्हाड यांची मतं वैध…

Media Control Online

 राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये अटीतटीची लढाई सुरू आहे. मविआनं अपक्ष आमदार आणि लहान पक्षांना आपल्याकडे वळवल्यानं त्यांचं पारडं जड मानलं जात आहे. तर मविआच्या एखाद्या आमदाराचं मत कमी कसं होईल, यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचं मत बाद ठरवलं जावं, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती. मात्र भाजपनं घेतलेला आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला. त्यामुळे मविआला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र या प्रकरणी भाजप केंद्रीय निवडणूक आयोगात धाव घेण्यात येणार असल्याचं समजतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *