पोस्ट कार्यालयातर्फे हर घर तिरंगा उपक्रम…!

विशेष वृत्त अजय शिंगे

कोल्हापूर : डाक विभागातर्फे जिल्ह्यातील सर्वच डाक कार्यालयांमार्फत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. हे वर्ष आझादी का अमृतमहोत्सव वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. याअंतर्गत ‘हर घर तिरंगा’ मोहिमेद्वारे प्रत्येक घरी तिरंगा उभारण्याचे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. यासाठी डाक विभागामार्फत तिरंगा विक्री सुरू केल्याची माहिती कोल्हापूर विभागाचे डाकघर अधीक्षक अर्जुन इंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.इंगळे म्हणाले, ‘हा उपक्रम १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येईल. विक्रीसाठीचा तिरंगा हा दोन बाय तीन आकाराचा असून २५ रुपये किंमत असेल. आजअखेर कोल्हापूर विभागातील तीन हेड पोस्ट ऑफिस, ९३ सब पोस्ट, ४६८ शाखा पोस्ट ऑफिसमार्फत तिरंग्यांची विक्री सुरू आहे. मोहिमेच्या प्रचारासाठी प्रभात फेरी, शाळा, स्थानिक स्वराज संस्थांना भेटी देणे आदी उपक्रम सुरू आहेत. नागरिकांनी पोस्ट ऑफिसमधून तिरंगा विकत घेऊन ही मोहीम यशस्वी करावी. जिल्ह्यात सुमारे साडेपाचशे टपाल कार्यालये असून, १ हजार २०० कर्मचारी घरांत तिरंगा पोहचविण्यासाठी काम करीत आहेत. आतापर्यंत १ हजार तिरंग्यांची विक्री झाली आहे.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *