बालगोपालचा पराभव करून शिवाजी तरूण मंडळ अंतिम फेरीत दाखल….

कोल्हापूर : शाहू गोल्ड कप अखिल भारतीय फुटबाॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील सामन्याला आज पासून सुरुवात झाली. पहिला उपांत्य फेरीतील सामना शिवाजी तरुण मंडळ विरुध्द बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात खेळला गेला. शिवाजीच्या करण चव्हाण बंदरे, निखिल कदम, अनिकेत जाधव तर बालगोपालच्या जीबीलो शुभ्रट परेरा, ऋतुराज पाटील यांनी केलेल्या चढया कामी आल्या नाही. पूर्वाधा दोन्ही संघाना गोल न करता आल्यानं सामना शून्य गोल बरोबरीत राहिला.

उत्तरर्धात ही दोन्ही संघांकडून खोलवर चढाईसाठी प्रयत्न झाले. शिवाजीकडून खेळत असलेला अंतरराष्ट्रीय स्टार फुटबाॉल खेळाडू अनिकेत जाधवला याचा सामन्यात प्रेक्षकांना अपेक्षित असा कोणताही करिश्मा दिसून आला आला नाही. बालगोपालच्या गोल क्षेत्रात चढाया सुरु असतांना उडालेल्या गोंधळाचा फायदा उठवत शिवाजीच्या संदेश कासरनं ६७ व्या मिनिटाला गोल करुन शिवाजीला १ -० अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी शिवाजी तरूण मंडळाला फार काळा टिकवता आली नाही. ७१ व्या मिनिटाला बालगोपालच्या जीबेलो यांनी गोल करुण शिवाजी संघाशी १ -१ अशी बरोबरी साधली.

Advertisements

संपूर्ण वेळेत हा सामना १ -१ असा बरोबरी राहिल्यानं हा सामना टायब्रेकरव खेळवला असता शिवाजी संघानं ३ -२ अशा गोलने बालगोपाल संघाचा पराभव करुण अंतिम फेरीत प्रवेश केला. शिवाजीचा गोलकीपर मयुरेश चाौगुलेनं बालगोपालच्या रोखलेल्या गोलीच क्रिडा प्रेक्षकांनी काौतुक होत केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *