२५ जानेवारीला कोल्हापुरात मानवतावादी साहित्य संमेलन
दोन हजार साहित्यिक लावणार हजेरी : उद्घाटक विद्रोही शाहीर शीतल साठे व सचिन माळी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दोन हजारांहून अधिक साहित्यिक, कलावंतांच्या उपस्थितीत लोकराजे राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीत मानवतावाद जोपासण्याच्या दृष्टिकोनातून मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीने २५ जानेवारीला सकाळी १०-३० वा. मुस्लिम बोर्डिंगचे मैदान, दसरा चौक येथे ज्येष्ठ साहित्यिक, दिग्दर्शक आणि निर्माते अ‍ॅड. डॉ. रमेश विवेकी यांच्या अध्यक्षतेखाली एकदिवशीय अखिल भारतीय मानवतावादी साहित्य संमेलन होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत निमंत्रक अंतिमा कोल्हापूरकर व मार्गदर्शक सुरेश केसरकर यांनी दिली

डॉ. राजेखान शानेदिवाण स्वागताध्यक्ष असणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन विद्रोही शाहीर शीतल साठे व सचिन माळी यांच्या हस्ते होणार असून यावेळी कोल्हापूरचे ज्येष्ठ मानवतावादी साहित्यिक व विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे आणि नाशिकचे भारतीय संविधानाचे अभ्यासक, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रा अँड गोव्याचे मा. चेअरमन अ‍ॅड. जयंत जायभावे यांना अ‍ॅड. विवेक घाटगे यांच्या हस्ते ‘मानवतावादी’ जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

सदर संमेलनास देशभरातून दोन हजारहून अधिक प्रागतिक विचारांचे साहित्य व कलेच्या क्षेत्रातील कवी, लेखक, साहित्यिक, समीक्षक, कलावंत, कार्यकर्ते, नेते उपस्थित राहणार आहेत. 

दुपारच्या सत्रात मानवतावाद या विषयावर डॉ. कपिल राजहंस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिसंवादात अ‍ॅड. कृष्णा पाटील, अ‍ॅड. करुणा विमल, प्राचार्य सुरेश कांबळे सहभागी होणार असून कवी व पत्रकार ताज मुल्लाणी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कवी संमेलनास डॉ. अमर कांबळे, संजय घाडगे, डॉ. किरण भिंगारदिवे, डॉ. सतीश कामत, प्रा. भाऊसाहेब गोसावी, डॉ. वसंत भागवत, प्रा. प्रकाश नाईक, रंजना सानप, प्रा. मोहन पाटील, आराधना गुरव, सतीश भारतवासी, तानाजीराव जाधव, संघसेन जगतकर, डॉ. सागर भजनावळे, सरिता माने, डॉ. सचिन कांबळे, रमेश नाईक, प्रा. राजू पुणेकर, बाबुराव कांबळे, शांतीलाल कांबळे यांच्यासह शंभरहून अधिक कवी सहभागी होणार आहेत.

स्मिता पानसरे, अ‍ॅड. सुनीता निकम, शंकर पुजारी, अ‍ॅड. मंचकराव डोणे, प्रा. दादासाहेब ढेरे, अ‍ॅड. अतुल जाधव यांच्या सन्माननीय उपस्थितीत होत असलेल्या संमेलनाचे व्यंकाप्पा भोसले, भरत रसाळे, उत्तम कांबळे, अ‍ॅड. प्रकाश मोरे, भरत लाटकर, कृष्णात पाटील, डॉ. प्रवीण कोडोलीकर, डॉ. नंदकुमार गोंधळी, हिंदुराव हुजरे-पाटील, भारती पवार, डॉ. शोभा चाळके, बबनराव रानगे, जॉर्ज क्रुझ, अब्राहमबापू आवळे, डॉ. अनिल कवठेकर, मधुकर शिर्के, सरला पाटील, रमेश कामत, सुभाष देसाई, शशिकला सरगर, षण्मुखा अर्दाळकर, सागर बगाडे, अनिता काळे, सुनील जाधव, अमित मेधावी, संजयकुमार अर्दाळकर, श्रीकांत कांबळे, रुपेश पाटील, विजय कुशाण, डॉ. दयानंद ठाणेकर, वसंत पाठक, संभाजी कांबळे, भारत धोंगडे, शंकर पुजारी, रघुनाथ मांडरे, गजानन शिरगावे, डॉ. संतोष कांबळे, नारायण कांबळे, दत्तात्रय गायकवाड, सिकंदर तामगावे, निती व नितेश उराडे, अनिता गायकवाड, उदय कांबळे, डॉ. सुजाता नामे, मोहन मिणचेकर, विमल पोखरणीकर, दत्तात्रय पाटील, प्रमोद कांबळे आदी मान्यवर मार्गदर्शक असणार आहेत.

संस्थापक अध्यक्ष अनिल म्हमाने, सहनिमंत्रक अर्हंत मिणचेकर, गंगाधर म्हमाने, सिद्धार्थ तामगावे, निवेदक अभिजीत मासुर्लीकर, बालनिमंत्रक आदित्य म्हमाने, अमिरत्न मिणचेकर, दुर्वा राजहंस यांनी संमेलनाचे आयोजन केले असून सदर संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 

पत्रकार परिषदेला अंतिमा कोल्हापूरकर, सुरेश केसरकर, विश्वासराव तरटे, अनिता काळे, सिकंदर तामगावे, भगवान माने, लालासाहेब नाईक, गंगाधर म्हमाने, अर्हंत मिणचेकर, सुनिल जाधव, अभिजीत मासुर्लीकर, विमल पोखर्णीकर, महेश तरटे आदी उपस्थित होते. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *