मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कोल्हापूर महानगरच्यावतीने जनसंवाद अभियान

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी शरद माळी  : भारत देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या वर्षपूर्ती निमित्य त्यांनी घेतलेल्या अनेक लोकोपयोगी निर्णयांची माहिती सर्वदूर सांगण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने दिनांक ३० मे ते ३० जून या कालावधीत जनसंवाद अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

या अभियानाची सुरवात दिनांक ३० मे रोजी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.जगतप्रकाश नद्डाजी यांच्या फेसबुक वरील लाईव्ह संबोधनाने झाली. या अभियानाच्या कालावधीमध्ये कोल्हापूर महानगर भारतीय जनता पार्टीच्यावतीने बूथ स्तरावरील प्रत्येक कार्यकर्ता सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळून घरा-घरा पर्यंत मोदीजींनी घेतलेले अनेक ऐतिहासिक निर्णय पोचवण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

Advertisements

गेल्या वर्षभराम्ध्ये तीन तलाक समाप्तीचा कायदा, घटनेचे कलम ३७० रद्द करणे, शेजारील देशातील पिडीत धार्मिक अल्पसंख्यांना नागरीक्त्व देण्यासाठी कायद्यात सुधारणा करणे, आयोध्या येथे भव्य राम मंदीराच्या निर्मितीचा मार्ग मोकळा होणे इत्यादी अनेक निर्णय गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित होते. परंतु मा.मोदीजींच्या नेतृत्वाखाली अशा असंख्य प्रलंबित निर्णय मार्गी लावून गतीमान प्रशासन कशा पद्धतीने चालवायचे असते याचा आदर्श घालून दिला असे म्हंटल्यास वावगे होणार नाही. दिनांक २३ मार्च २०२० पासून संपूर्ण देशात कोरोनाचे संकट घोंगावू लागले परंतु अशा बिकट परिस्थिती मध्ये देखील मा.मोदीजी यांनी संपूर्ण देशाला आवाहन करून लॉकडाऊनचा कठोर निर्णय घेतला. कोरोना संक्रमनाची साखळी तोडण्यासाठी मा.पंतप्रधानांनी केलेल्या आवाहानाला देशातील सर्वच नागरीकांनी भक्कम पाठींबा दिला. या निर्णयाचे कौतुक जगभरातील अनेक प्रगतशील राष्ट्रांच्या राष्ट्राध्यक्षांनी केले.

तसेच जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली या अभियानाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच जिल्हा संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, जिल्हा उपाध्यक्ष मारुती भागोजी, चंद्रकांत घाटगे, संतोष भिवटे, अमोल पालोजी, संजय सावंत, राजू मोरे, विजय आगरवाल, सचिन तोडकर, भारती जोशी, किशोरी स्वामी इत्यादी पदाधिकारी हे अभियान यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *