Share Now
Read Time:1 Minute, 21 Second
मिरज प्रतिनिधी नजीर शेख : चीनच्या वूहान मधून कोरोना हा संसर्गजन्य आजार देशाबरोबर महाराष्ट्रातही फैलावला. या संसर्गजन्य आजाराला भारत सक्षमपणे तोंड देत असतानाच चीनने भारतीय सीमेवर कुरघोडी करण्यास सुरवात केली.
भारत व चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात १५ जून रोजी भारतीय जवानांवर चीनने भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात कर्नल दर्जाच्या अधिकाऱ्यासह २० जवान शहीद झाले. चीनच्या या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मिरज शहर शिवसेनेच्या वतीने चीन राष्ट्राध्यक्षाचा पुतळा जाळून चीनचा निषेध करण्यात आला. व शहीद भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी मिरज शिवसेना शहरप्रमुख विशालसिंह राजपूत, दीपक पाटील, पिंटू पाटील, महेश लोंढे , कुबेरसिंह राजपूत , मारुती भोसले ,किरणसिंह राजपूत, गजानन मोरे हे मन्यवर उपस्थित होते.
Share Now