मिरज विशेष प्रतिनिधी नजीर शेख : मिरजेतील पाण्याची अमृत योजना आता अखेर पूर्णत्वास येत असल्याचे दिसत आहे . प्रभाग क्रमांक ४ मधील विस्तारित भाग असलेल्या मालगाव रोड भागातील अमृत योजनेचे काम आता ८० टक्के झाले आहे. तसेच बरेच वर्ष पाण्याचा त्रास सहन केलेल्या मिरजेतील ब्राह्मणपुरी भागातील अमृत योजनेचे आज टेस्टिंग घेण्यात आले .
येत्या ८ दिवसात येथेही अमृत योजनेचे पाणी सुरू होणार असून, या भागातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
Advertisements

यावेळी नगरसेवक पांडुरंग कोरे, नगरसेवक निरंजन सुरेश आवटी ,सुमेध ठाणेदार ,संदीप सलगर ,पाणी पुरवठा अधिकारी श्री राजपूत ,अमृत योजनेचे श्री.कुलकर्णी , देव माने, शुभम शिंदे ,आणि पाणीपुरवठा विभाग चे कर्मचारी उपस्थित होते.
