कोविड संदर्भात राज्यात १ लाख ९७ हजार गुन्हे दाखल तर ३१ हजार व्यक्तींना अटक

मुंबई प्रतिनिधी तानाजी कांबळे : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ९७ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते २० जूलै या कालावधीत कलम १८८ नुसार १,९७,५४१ गुन्हे नोंद झाले असून ३१,३३२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी ६ लाख १९ हजार ७९४ पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले.

Advertisements

 

कडक कारवाई
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत, अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.
या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या ३१५ घटना घडल्या. त्यात ८८१ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

    १०० नंबर : १ लाख ७ हजार फोन

  पोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर १,०७,८४२ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.
तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ८०५ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले, अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली.
या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३४६ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

 

पोलिस कोरोना कक्ष
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील ४७ पोलीस व ४ अधिकारी अशा एकूण ५१, ठाणे शहर ७ व ठाणे ग्रामीण २ व १ अधिकारी, रायगड २, पुणे शहर ३, नाशिक शहर १, सोलापूर शहर ३, अमरावती शहर १ (wpc) , मुंबई रेल्वे ४, नाशिक ग्रामीण ३, जळगाव ग्रामीण १, जालना (SRPF) १ अधिकारी, नवी मुंबई (SRPF) १, पालघर २, ए.टी.एस. १, उस्मानाबाद १, औरंगाबाद शहर १, जालना ग्रामीण १, नवी मुंबई १, अशा ८८ पोलिस बांधवांचा मृत्यू झाला.

  पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर , त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या १९९ पोलीस अधिकारी व १४१० पोलीस कोरोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *