छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर शासनाची वाटचाल

मिडीया कंट्रोल न्युज नेटवर्क

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, म. जोतीराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर शासनाची वाटचाल सुरू आहे, असे सांगून पुढे
पालकमंत्री म्हणाले, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ४३ हजार ९६५ शेतकऱ्यांच्या खात्यावर २६२ कोटी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यास शासन वचनबध्द आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक बँकेच्या कर्ज खात्याशी संलग्न करुन त्यांचे प्रमाणिकरण करणे गरजेचे आहे.

Advertisements

या योजनेमुळे प्रती शेतकरी दोन लाखांपर्यतची कर्जमुक्तीची रक्कम राज्य शासन शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट जमा करत आहे. राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बॅंका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्थाकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीककर्ज “महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने” तून माफ केले जात आहे. तसेच जे शेतकरी अल्प मुदत पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करीत असतात, अशा शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन देण्याचा शासनाचा मानस आहे.

दहा रुपयात शिवभोजन थाळी योजना आघाडी शासनाने सुरु केली आहे. शिवभोजन थाळी या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ जिल्ह्यातील हजारो गरजू लोकांना होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने केवळ पाच रुपयात शिवभोजन थाळी योजना राबवून अडचणीत सापडलेल्या गरजूंना पोटभर जेवण उपलब्ध करुन दिले आहे. जिल्ह्यात ३४ ठिकाणी ही योजना सुरु असून आतापर्यंत ४ लाख २१ हजार ४७७ लाभार्थ्यांना याचा लाभ झाला आहे.
गुन्हे नियंत्रण व कायदा सुव्यवस्थेबरोबरच ग्रामपंचायत हद्दीत होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी सीसीटीव्ही कंट्रोल रुमचा वापर उपयुक्त असल्याने पाचगाव, मोरेवाडी व कळंबा या ग्रामपंचायतींसाठी पोलीस विभागाच्या माध्यमातून व जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून १ कोटी ९ लाख १५ हजार इतका निधी खर्च करुन सीसीटीव्ही कंट्रोल रुम पाचगांव येथे कार्यान्वित करण्यात आली आहे.
या माध्यमातून या तीन गावातील ६३ ठिकाणी १४७ कॅमेरे बसविण्यात आले आहेत, असे सांगून पोलीस शौर्य पदक मिळालेल्या अधिकारी व जवान अशा १४ जणांचे त्यांनी अभिनंदन केले.
नुकत्याच जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील चार गुणवंत विद्यार्थ्यांनी यश मिळाले आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *