भ्रष्ट गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेऊन सखोल चौकशी करा ; भारतीय जनता पार्टीचा सवाल

काल मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि आयपीएस अधिकारी परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यपाल यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांवर धक्कादायक आरोप केले. या धक्कादायक घडामोडीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात या सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत असून भारतीय जनता पार्टीच्यावतीने महाराष्ट्र भर गृहमंत्री आणि या सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी होत आहे.
भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्यावतीने बिंदू चौक येथे भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचे नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करून या सरकारचा व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. भाजपा कार्यकर्त्यांनी या महावसुली सरकारचा तीव्र निषेध केला. ‘100 कोटी माझे…..आता नाहीत वाझे ’, ‘महा वसुली सरकारचा धिक्कार असो’, ‘गृहमंत्री राजीनामा द्या’ ‘ अनिल देशमुख हे गृहमंत्री की….वसुली मंत्री’, ‘ अनिल देशमुख यांचा धिक्कार असो’, ‘ठाकरे सरकार चले जाओ’, ‘आता तर हे स्पष्ट आहे……ठाकरे सरकार भ्रष्ट आहे’ असे फलक घेऊन घोषणांनी बिंदू चौक परिसर दणाणून सोडल
जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे हे उपस्थितांना संबोधित करताना महाराष्ट्र राज्यातील एक मोठे कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी परमवीर सिंह यांनी थेट गृहमंत्र्यांवर जे आरोप केले आहेत यामुळे या सरकार मधील वसुली एक प्रकारे चव्हाट्यावर येऊन महाराष्ट्राचे लचके तोडण्याचे काम या प्रकरणामुळे उजेडात आले आहे. एका API सारख्या पोलीस अधिका-या कडून गृहमंत्री जर १०० कोटी वसुली करून घेत असतील तर गृहमंत्र्यांची एकूण कमाई किती असेल असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे त्याचबरोबर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तात्काळ राजीनाम घेऊन त्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी करत असल्याचे सांगितले.

याप्रसंगी सरचिटणीस दिलीप मेत्राणी, उपाध्यक्ष चंद्रकांत घाडगे, मारुती भागोजी, संजय सावंत, संतोष भिवटे, राजू मोरे, अमोल पालोजी, विजय अग्रवाल, सचिन तोडकर, प्रदीप उलपे, मंडल अध्यक्ष संतोष माळी, भरत काळे, प्रदीप पंडे, ओंकार खराडे, राहुल पाटील, विजय खाडे, महेश यादव, आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *