स्वाभिमानी कोल्हापूरकर विरोधकांना त्यांची जागा दाखवून देतील : पालकमंत्री सतेज पाटील..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकामंत्री हसन मुश्रीफ यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला.

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले चंद्रकांत जाधव यांना कोल्हापूरच्या जनतेने पाच वर्षासाठी निवडून दिले होते मात्र नियतीने घाला घातल्याने या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. काही मंडळी प्लास्टिक डबे वाटत आहेत ते चांदीचे डबे वाटूदेत नाहीतर सोन्याचे त्याच डब्यात घालून त्यांना परत पाठवल्या शिवाय कोल्हापूरची जनता शांत राहणार नाही, कोल्हापूरकरांच्या स्वाभिमानाला कोणी डिवचण्याचा प्रयत्न केला तर काय परिणाम होतात हे अनेकांना माहिती आहे. चंद्रकांत जाधव यांची कोल्हापूर शहराच्या विकासाची अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जयश्री जाधव यांना निवडून देऊन ताराराणीच्या भूमीतील पहिल्या महिला आमदार म्हणून विधिमंडळात जाण्याची संधी द्या असे आवाहन यावेळी बोलतांना पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूरकरांना केले.

Advertisements

ग्रामविकामंत्री हसन मुश्रीफ म्हणाले राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून भाजप ठाकरे कुटुंबियांवर हल्ला करायची एकही संधी सोडत नाही. सच्चा शिवसैनिक हे कधीही विसरणार नाही. मिळालेल्या आमदारकीचा फायदा घेत चंद्रकांत जाधव यांनी सामान्यांना दिलासा देण्याचे काम यांनी केले त्यामुळे या पोट निवडणूकीत लाखो भाऊ जयश्री जाधव यांच्या पाठीशी राहुन रात्रीचा दिवस करून त्यांना निवडून आणतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खासदार धैर्यशील माने म्हणाले चार राज्यातील निकालाचे परिणाम कोल्हापूर मध्ये दिसणार नाहीत कारण ही शाहू महाराज व महाराणी ताराराणी यांची भूमी आहे यांच्या काळात वाहणाऱ्या वाऱ्याचा रोग बदलण्याची टाकत कोल्हापूरच्या जनतेत आहे येथील जनता स्वाभिमानी आहे त्यांच्या विचार झालेला नतमस्तक होऊन स्पर्श केला तर ती कोणालाही डोक्यावर घेते. मात्र त्यांच्या भावनांना ठेच पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पंचगंगेचा घाट दाखवते हे विरोधकांनी लक्षात ठेवावे.

अरुण दुधवाडकर म्हणाले चार राज्यात सत्ता आल्याने काही लोकांना वेगळीच स्वप्न पडत आहेत.पण शाहूंच्या या नगरीत खोटारड्या लोकांचा त्यांची योग्य ती जागा दाखवली जाईल. कोल्हापुरातील कडव्या शिवसैनिकांनी भाजप वर तुटून पडावे आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना विजयी करण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवाडकर यांनी यावेळी केले.

यावेळी बोलताना जयश्री जाधव यांनी आपली खंत व्यक्त केली. माणुसकीच्या भावनेतून मला पाठिंबा देण्याची विनंती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना केली होती मात्र त्यांनी भाजप कडून लढण्यास सांगितले स्वर्गीय चंद्रकांत जाधव यांनी खांद्यावर घेतला झेंडा कदापि सोडणार नाही पाटील यांनी मनाचा मोठेपणा दाखवला नाही.

जाधव कुटुंबाने भाजपला साथ दिली मात्र त्यांच्यावर आघात झाल्यानंतर खरे तर चंद्रकांत पाटील यांनी बिनविरोध करायला हवे होते अडीच वर्षानंतर जी काही लढाई करायची असतेती केली असती तर कोणी वाईट म्हटले नसते मात्र चंद्रकांत पाटील हे माणुसकी विसरले अशी टीका भारती पवार यांनी केली. यावेळी यावेळी आमदार ऋतुराज पाटील आमदार जयंत तासगावकर, आमदार राजू आवाळे, आर के पवार, सचिव चव्हाण, डी.जी.भास्कर, यांनी मनोगत व्यक्त केले सुरेश साळुंखे ए. वाय. पाटील, विजय देवणे, मुरलीधर जाधव, राजू लाटकर, निलोफर आजरेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *