देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे –पृथ्वीराज चव्हाण

विशेष वृत्त अजय शिंगे

कोल्हापूर : केंद्र शासनाच्या कामगिरीवर टीका करताना. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “देशाची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. शेजारील पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आदी देशांची वाताहात झाली आहे. तशी अवस्था भारतात निर्माण होत आहे. देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू झाली आहे. उदारमतवाद शिल्लक राहणार का असा प्रश्न निर्माण झाला असून लोकशाही धोक्यात आली आहे.”

Advertisements

तसेच, “विरोधक संपवून टाकण्याची भाषा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बोलून दाखवत आहेत. ईडी, सीबीआय अशा संस्थांचा दुरुपयोग करून विरोधकांची मुस्कटदाबी केली जात आहे. देशातील जनता सुज्ञ होऊन अशा प्रकाराविरुद्ध आवाज उठवला नाही तर विरोधकांचे अस्तित्व संपून जाईल.” अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

राज्यात सध्या आरोप प्रत्यारोपाचे वातावरण बघायला मिळत आहे. तसेच आता एकनाथ शिंदे गटातील आमदारांवर निलंबनाची टांगती तलवार असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात सुनावणीदेखील सुरू आहे. तसेच सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते, यावर सर्व अवलंबून आहे. यासंदर्भात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपले मत व्यक्त केले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणालेत, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात मोठा राजकीय पेच निर्माण झालाय असे त्यांनी सांगितले.

शिंदे गटाच्या विलीनीकरणाबाबत स्पष्टीकरण देताना चव्हाणांनी सांगितले की, किमान दोन तृतीयांश सदस्यांनी कुठल्यातरी पक्षात विलीन झाले पाहिजे, अशी राज्यघटनेत तरतूद आहे. पण, असे झालेले नाही. त्यानंतर आता त्यांना विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही, असा तर्कसुद्धा दिला जात आहे. आता ही घटना घडून गेली. अध्यक्षांनी ज्या नेत्याला गटनेता म्हणून मान्यता दिली आहे किंवा प्रतोद म्हणून मान्यता दिलेली आहे. त्यांचा आदेश मोडलेला आहे. त्यामुळे व्हीप मोडला आहे, त्यात काहीही शंका नाही. राज्यघटनेच्या दहाव्या परिशिष्टाप्रमाणे पक्षांतर बंदी कायद्यात जी तरतूद करण्यात आली आहे, त्याचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदार निलंबनाला पात्र आहेत. असे सूचक विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. आता सर्वोच्च न्यायालय कोणता निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे

शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये माजीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची नावे पुढे आली आहेत. याकडे आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे लक्ष वेधले असता, त्यांनी मंत्रिमंडळात सत्तार यांना शिक्षण मंत्री करायला हवे, असा टोला लगावला.पत्रकार परिषदेत बोलत असताना चव्हाण यांनी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *