कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने जोर धरल्याने पुन्हा एकदा पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर…!

विशेष वृत्त अजय शिंगे

कोल्हापूर: गेल्या काही दिवसापासून सूरू आसलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे? गेले काही दिवस राधानगरी, गगनबावडा येथे मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नद्यांच्या पाणी पातळी मध्ये कमालीची वाढ होत आहे . राधानगरी धरण सध्या ८३% भरले असून पुढील ३/४ दिवसात धरण पूर्ण क्षमतेने भरले जाईल. कोल्हापूर मध्ये गेल्या दोन दिवसात सुरू असलेल्या पावसामुळे राजाराम बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे.तर पंचगंगा नदीचे आज सकाळीच पाणी पात्राबाहेर पडले आहे. गेल्या २४ तासात पंचगंगेची पाणी पातळी ७ फुटांनी वाढली आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *