व्यावसायिक, रिक्षा, टॅक्सी, बस वाहनांवरील योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण विलंब शुल्क आकारणीस स्थगिती..

कोल्हापूर दि. १२ : वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र विहित वेळेत वाहन मालकाने उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून नुतनीकरण केले नाही तर केंद्र शासनाने केंद्रीय मोटार वाहन कायद्याने संबंधित वाहन चालकांकडून ज्या दिवशी योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाची मुदत संपली आहे, […]

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनचा पदग्रहण सोहळा संपन्न,
अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक यांची, तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी आणि सेक्रेटरी पदी बी एस शिंपुकडे यांची निवड झालीय. नूतन पदाधिकार्‍यांचा पदग्रहण सोहळा, गुरूवारी एका शानदार समारंभात संपन्न झाला. […]

वाहन पासिंग विलंब शुल्क अखेर सरकारकडून रद्द –
आमदार सतेज पाटील यांनी विशेष उल्लेख सूचनेद्वरे वेधले लक्ष

कोल्हापूर : रिक्षा, टॅक्सी, लक्झरी बसेस आदी वाहनांच्या पासिंगसाठी आकारले जाणारे विलंबशुल्क आणि प्रादेशिक विभागाच्या अन्य जाचक अटी रद्द कराव्यात अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी विशेष उल्लेख सूचनेद्वारे विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे […]

सेवा रुग्णालयात ‘राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम’ कक्ष कार्यरत

कोल्हापूर:  कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात ‘राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम’ हा कक्ष कार्यरत आहे. या कार्यक्रमांतर्गत मानसिक आजार असलेल्या रुग्णांवर उपचार, समुपदेशन व मोफत औषधोपचार करण्यासाठी 24 तास मोफत समुपदेशन सेवा देण्यात येत आहेत. मानसिक […]

वडीलांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मस्के परिवाराने केले वृक्षाचे वाटप

वाठार, प्रकाश कांबळे : वाठार ता. हातकणंगले येथे कै कृष्णा भाऊ मस्के यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त पारंपरिक पद्धतीला फाटा देत पर्यावरणाचा समतोल राहावा म्हणून डॉ अजय मस्के व ऍड विजय मस्के या बंधूनी आपल्या विस्डम फाउंडेशनच्या […]

जिल्ह्यातील 18 बंधारे पाण्याखाली; राधानगरी धरणातून 1300 क्युसेक विसर्ग

कोल्हापूर, दि. 11  : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 3.98 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड,शिरोळ व रुकडी, ताम्रपर्णी […]

दूध संस्था इमारत बांधकाम अनुदानात ‘गोकुळ’ कडून १५ हजार रुपयाची वाढ..

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा (गोकुळ) ने नेहमीच दूध उत्पादक, सभासद बरोबरच प्राथमिक दूध संस्थांचे ही हित जोपासले असून गोकुळ संलग्न दूध संस्थाचे बळकटीकरण करण्यासाठी दूध संस्था इमारत बांधकाम अनुदान योजनेमध्ये गोकुळला […]

पावसाळ्यात वीजेमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी सावधानता बाळगावी
नागरिकांना महावितरणचे आवाहन..

कोल्हापूर – पावसाळ्याच्या दिवसात विजेमुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाण वाढते, ही चिंतेची बाब आहे. विजेपासूनचा हा धोका टाळता येणे शक्य आहे. पावसाळ्याच्या दिवसात वीजेमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे महावितरणचे आवाहन आहे. पावसाळ्याचे दिवसात […]

अभय योजना-2023 अंतर्गत ऑगस्ट 2024 अखेर मुद्रांक शुल्क व दंडामध्ये सवलत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

कोल्हापूर : महसूल व वन विभागाच्या दिनांक 07 डिसेंबर 2023 च्या आदेशानुसार थकित असलेल्या मुद्रांक शुल्काचा भरणा करण्यासाठी महाराष्ट्र मुद्रांक शुल्क व दंड सवलत योजना-2023 शासनाने दोन टप्यामध्ये जाहीर केली आहे. योजनेचा पहिला टप्पा 1 […]

पात्र लाभार्थीं महिलांना योजनेपासून वंचित राहू देवू नका – जिल्हाधिकारी अमोल येडगे –

कोल्हापूर, दि.10 : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून ऑनलाईन स्वरुपात आत्तापर्यंत 29547 व ऑफलाइन 88470 महिलांनी सहभाग घेतला आहे. शासनाची ही योजना महत्त्वकांक्षी असून गाव, तालुका आणि जिल्हास्तरावर चांगल्या प्रकारे नागरिकांना […]