रासायनिक खतांचा पुरवठा सुरळीत करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा: नेताजी बुवा ,जिल्हा उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड

हमिदवाडा प्रतिनिधी, दि १ : कागल तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यात रासायनिक खतांचा कृत्रिम तुटवडा जाणवत आहे याबाबत ठोस उपाय योजना करून हा रासायनिक खतांचा तुटवडा पूर्ववत करावा या मागणीचे निवेदन तालुका कृषी अधिकारी कार्यालय कागल या […]

निवडणूक आयोगाने मतदानासाठी ठरवून दिलेल्या  १२ पैकी १ पुरावा ग्राह्य धरणार : निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर….!

कोल्हापूर/प्रतिनिधी  दि. १ : जिल्हयातील २७६ कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणुकीचे मतदान दिनांक १२ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ७.०० ते सायं. ६.०० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीत निवडणूक आयोगाने मतदानासाठी ठरवून दिलेल्या  […]

शिंगणापूर पाणी उपसा यंत्रामध्ये बिघाड झाल्याने १ एप्रिलपासून एक दिवस आड पाणी पुरवठा..!

कोल्हापूर /प्रतिनिधी : शिंगणापूर योजनेवरील पाणी उपसा यंत्रामध्ये बिघाड झाल्याने या योजनेवरील चार पंपांचा पाणी उपसा कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे ए/बी व ई वॉर्ड त्यास सलग्नीत उपनगरे ग्रामिण भागातील दैनंदिन पाणी पुरवठा पूर्ण क्षमतेने […]

महापालिकेच्या महसूली उत्पन्नामध्ये ३८०.६३ कोटी महसूल जमा…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : महानगरपालिकेच्या सन २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत विविध विभागाकडून महसूली उत्पन्नामधून ३८०.६३ कोटी महसूल जमा झाला आहे. यामध्ये नगररचना विभागाने ६६.६० कोटी महसूल जमा केला आहे. नगररचना विभागाला यावर्षी ४४.६८ कोटीची […]

उघड्यावर कचरा जाळल्या प्रकरणी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना दंड…

कोल्हापूर/प्रतिनिधी : शेंडापार्क येथील महाराष्ट्र विद्युत मंडळ कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी उघडयावर कचरा जाळल्याबदल महापालिकेच्यावतीने दंड करण्यात आला. महानगरपालिकेमार्फत मान्सून पूर्व नियोजनासाठी नाले सफाईचे काम सुरु आहे. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी या कामाची पाहणी करत असताना […]

जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द….!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि. २९ : २७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाची पोट निवडणूक जाहीर झाली आहे. त्याची आचारसंहिता लागू झाली असल्याने दि. ४ एप्रिल रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन घेण्यात येणार नाही, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी […]

तृतीयपंथीय मतदार नोंदणीसाठी शुक्रवारी विशेष शिबीराचे आयोजन…!

कोल्हापूर/प्रतिनिधी,दि. २९ : आंतरराष्ट्रीय तृतीय पंथी दिनानिमित्त तृतीय पंथीयांसाठी शुक्रवार दि. १ एप्रिल रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदार नोंदणीच्या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा […]

जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. विरेंद्र कानडीकर तर सचिवपदी डॉ. राजेश सोनवणे तर खजानीसपदी डॉ.अजित कदम यांची निवड..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन(जी. पी. ए) च्या सन २०२२-२३ या सालासाठी डॉ. विरेंद्र कानडीकर यांची अध्यक्षपदी तर डॉ. राजेश सोनवणे यांची सचिव व डॉ.अजित कदम यांची खजानीसपदी निवड करण्यात आली आहे. अध्यक्ष-डॉ. विरेंद्र कानडीकर […]

हमीदवाडा ग्रामपंचायतीला मनसेचा दणका: गाव तळ्यातला गाळ वाजत – गाजत आणून टाकला ग्रामपंचायत हमिदवाडा कार्यालयाच्या दारात…!

हमिदवाडा प्रतिनिधी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आंदोलन करण्यात आले. दिनांक २२/०२/२०२२ रोजी ग्रामपंचायत हमिदवाडा यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तळ्यातील गाळ काढण्यास संदर्भात लेखी निवेदन दिले […]

यंदा जोतिबाचा गुलाल उधळणार, भाविकांना निर्बंध नाहीत ना. सतेज (बंटी) पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची ‘चैत्र यात्रा’ गेली दोन वर्ष कोरोनाच्या संकटामुळे झालेली नाही. मात्र यंदा १६ एप्रिल रोजी होणाऱ्या या यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज जोतिबा मंदिर परिसराला भेट देऊन यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला. […]