शिवाजी विद्यापीठात सुरू होणार्या् कोरोना रूग्णालयासाठी भारतीय जनता पक्ष आणि महाडिक परिवाराच्यावतीने १०० बेडस् प्रदान

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी :  कोल्हापूर जिल्हयात कोरोनाचा संसर्ग रोखण्यात बर्‍यापैकी यश आले आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून ५०० बेडची दोन कोरोना हॉस्पिटल सज्ज ठेवण्यात येणार आहेत. त्यापैकी एक हॉस्पिटल शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात बनत आहे. […]

विना मास्क व हॅण्डग्लोज न घातलेल्या ८४ जणांकडून २०१०० चा दंड वसूल

कोल्हापूर प्रतिनिधी नियाज जमादार : महापालिका आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई आणि त्यांच्या पथकाने शहरातील विना मास्क, विना हातमोजे, सार्वजनिक ठिकाणी थूंकणे व सोशल डिस्टंन्स न पाळणे अशा ८४  भाजी, दुकानदार, मेडिकल विक्रेते व […]

महापालिकेच्यावतीने बुध्द जयंती साजरी

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क :  बुध्द जयंती निमित्त महापालिकेच्यावतीने आज महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात गौतम बुध्दांच्या पुतळयास महापौर सौ.निलोफर आजरेकर व आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते फुले वाहण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. तसेच परिवर्तन फोंडेशन […]

टेम्पोने कारला दिलेल्या धडकेत सरनोबतवाडीचा तरुण ठार , उचगाव जकात नाक्याजवळील प्रकार

गांधीनगर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : भरधाव माती भरून आलेल्या टेम्पोने स्विफ्ट कारला जोरदार धडक दिल्याने  शुभम शशिकांत भोसले (वय २६ , रा.ग्रामपंचायतीसमोर,सरनोबतवाडी) हा कारचालक ठार झाला. हा अपघात उचगाव (ता. करवीर) येथील घाटगे-पाटील इंडस्ट्रीजनजीक असलेल्या जकात नाक्याजवळ […]

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना प्रशासनाच्यावतीने अभिवादन

कोल्हापूर प्रतिनिधी चेतन शहा : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. यावेळी जिल्हा पुरवठा […]

अंकली-उदगाव नाक्याजवळ पोलीसांकडून काटेकोर तपासणी : पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख
काल एका दिवसात 2 हजार वाहनांचा प्रवेश

कोल्हापूर प्रतिनिधी नियाज जमादार : माल वाहतूक वाहनामधून प्रवासी वाहतूक होणार नाही, याची काटेकोरपणे दक्षता पोलीसांकडून घेण्यात येत आहे. जयसिंगपूर जवळील अंकली-उदगाव तपासणी नाक्यामधून काल एका दिवसात दोन हजार वाहनांचा प्रवेश झाला असल्याची माहिती पोलीस […]

भाजप नेत्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून विकृत टीका

कोल्हापूर प्रतिनिधी शरद गाडे :  राज्यात गेले काही दिवस राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी, माजी मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून अत्यंत वाईट स्वरूपाच्या भाषेमध्ये टीका होताना दिसत आहे. सरकारने अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकांचा शोध […]

गडमुडशिंगीत सतेज पाटील ग्रुपतर्फे “कोरोनाविरुद्ध लढणाऱ्यांचा” सत्कार

विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : कोरोनाच्या जागतिक महामारीच्या लढ्यात योगदान देणाऱ्या सर्व संबंधित घटकांचा गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील सतेज पाटील ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला. ग्रामीण संपर्कप्रमुख बजरंग रणदिवे यांच्या हस्ते फेटा व रोप देऊन […]

इचलकरंजीतील पहिल्या कोरोना मुक्त बालकास टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात डिस्चार्ज

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : इचलकरंजीमधील चार वर्षीय बालकाचे दोन्ही कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याने आज त्याला आयजीएम रूग्णालयातून टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात डिस्चार्ज देण्यात आला हातकणंगले येथील संस्थात्मक अलगीकरण केंद्रात सध्या पाठवण्यात आले आहे. रुग्णालयाचे […]

सेंट झेव्हिअर्सच्या माजी विद्यार्थ्यांकडून अडीच लाखाचे साहित्य ग्राम विकासमंत्र्यांकडे सुपूर्द

कोल्हापूर प्रतिनिधी नियाज जमादार : येथील सेंट झेव्हिअर्स हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सीपीआर तसेच महापालिका रुग्णालयास सुमारे अडीच लाखाचे कोरोना प्रतिबंधक साहित्य ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आज सुपूर्द केले. ग्रामविकास मंत्री […]