जिल्ह्यात लॉकडाऊनचा कोणताही विचार नाही, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन  करण्याच्या अफवा काही समाजविघातक प्रवृत्तीकडून पसरविल्या जात आहेत.

जिल्हाधिकारी चौधरी यांनी याची दखल घेत जिल्ह्यात लॉक डाऊन करण्याचा कोणताही विचार नसून, प्रशासन स्तरावर कोणतीही चर्चा नाही. प्रशासन सर्व परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहे,  त्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याच्या पसरवण्यात येणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास विश्वास ठेवू नये व जीवनावश्यक वस्तूंचा अनावश्यक साठा करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले.

Advertisements

लॉकडाऊनच्या काळात जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्याच वेळी कोरोनाच्या  प्रादुर्भावाचा धोकाही वाढला आहे . त्यामुळे नागरिकांनी स्वच्छतेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत. वारंवार हात स्वच्छ धुवावेत. डोळे नाक तोंड यांना स्पर्श करू नये, मास्कचा वापर अनिवार्यपणे करावा. विनाकारण घराबाहेर  पडू नये, तसेच  ताप ,सर्दी खोकला डोकेदुखी अंगदुखी श्वसनाचा त्रास , मळमळ कोणतीही लक्षणे जाणवल्यास आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा मधुमेह ,रक्तदाब, हृदयाशी संबंधित, श्वसनासंबंधित विकार, असणाऱ्यांनी व  ६५ वर्षावरील नागरिक, दहा वर्षाखालील मुले, गरोदर स्त्रिया यांची अधिक काळजी घ्यावी, असे  आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *