हमीदवाडा ग्रामपंचायतीला मनसेचा दणका: गाव तळ्यातला गाळ वाजत – गाजत आणून टाकला ग्रामपंचायत हमिदवाडा कार्यालयाच्या दारात…!

हमिदवाडा प्रतिनिधी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आंदोलन करण्यात आले. दिनांक २२/०२/२०२२ रोजी ग्रामपंचायत हमिदवाडा यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तळ्यातील गाळ काढण्यास संदर्भात लेखी निवेदन दिले […]

यंदा जोतिबाचा गुलाल उधळणार, भाविकांना निर्बंध नाहीत ना. सतेज (बंटी) पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची ‘चैत्र यात्रा’ गेली दोन वर्ष कोरोनाच्या संकटामुळे झालेली नाही. मात्र यंदा १६ एप्रिल रोजी होणाऱ्या या यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज जोतिबा मंदिर परिसराला भेट देऊन यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला. […]

२ उमेदवारांची माघार : १५ उमेदवार निवडणूक रिंगणात….!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२८ : २७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी २ उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले असून १५ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर […]

धर्माच्या आचरणाचून अध्यात्माचा अनुभव येतो : प. प. श्री विद्यानृसिंह भारती स्वामी..!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि. २७ : धर्माच्या आचरणाचून अध्यात्माचा अनुभव येतो, असे प्रतिपादन प. प. श्री विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी आज केले. मराठी महिन्यांमध्ये नूतन वर्ष गुढीपाडव्याला सुरुवात होते. त्या दृष्टीने करवीर पीठाच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून […]

उत्तर विधानसभा पोटनिवडणुक : मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केली मतमोजणी कक्षाची पाहणी

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.२२: प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज २७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक कामकाजाचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी राजाराम तलाव परिसरातील गोदाम येथील मतमोजणी कक्ष व स्ट्रॉंग रुमची पाहणी केली. […]

भारतीय डाक कोल्हापुर विभागामार्फत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला १०,००० कापडी पिशव्या सुपुर्द…!

कोमल शिंगे, कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतीय डाक कोल्हापूर विभागामार्फत दि. २०-०३-२०२२ रोजी सकाळी ८.३० वाजता महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्लॅस्टिकचा मानवी जीवनावर होणारा परिणाम लक्षात घेऊन भाविकांकडून प्रसादासाठी होणारा प्लॅस्टिक बॅगेचा […]

स्वाभिमानी कोल्हापूरकर विरोधकांना त्यांची जागा दाखवून देतील : पालकमंत्री सतेज पाटील..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकामंत्री हसन मुश्रीफ यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव […]

उत्तर विधानसभा पोटनिवडणुकी संदर्भात माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली….!

कोल्हापूर/प्रतिनिधी :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसला हिरवा कंदील दाखवल्यानंतर शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर नाराज होते. दोन दिवस ते नॉट रिचेबल होते. क्षीरसागर आज कोल्हापुरात परतल्यानंतर त्यांनी नाराज शिवसैनिकांची समजूत काढून […]

विजांच्या कडकडाटासह कोल्हापुरात पावसाचे आगमन…..!

कोल्हापूर प्रतिनिधी : गेले दोन दिवस कोल्हापूर मध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. आणि तापमान हि वाढले होते. आज सायंकाळ पासुन हवेत गारठा निर्माण होऊन विजांच्या कडकडाटासह कोल्हापूर मध्ये पावसाला सुरुवात झाली.  

प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे कोल्हापूर दौऱ्यावर…!

अर्चना चव्हाण  कोल्हापूर/प्रतिनिधी दि. १७ : प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार दि. २१ मार्च रोजी दुपारी २ वाजता कोल्हापूर येथे आगमन. […]