महापालिकेच्यावतीने शहरामधील सर्वच लहान व मोठया नाल्यांची सफाई करण्यात आली.

कोल्हापूर प्रतिनिधी : शहरामध्ये महानगरपालिकेच्यावतीने दरवर्षी पावसाळयापुर्वी पोकलॅन्ड, जेसीबी व कर्मचा-यांच्या सहाय्याने नाले सफाई करण्यात येते. यावर्षीही पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाले सफाई करण्याच्या सूचना आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिल्या आहेत. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, […]

कोल्हापूरच्या महापौरपदी सौ.रुपाराणी निकम
उपमहापौर पदी अक्षय जरग यांची निवड

कोल्हापूर ता.६ :- कोल्हापूर महानगरपालिकेच्या ५१ व्या महापौरपदी नगरसेविका सौ.रुपाराणी संग्रामसिंह निकम यांची तर ४६ व्या उपमहापौरपदी नगरसेवक अक्षय विक्रम जरग यांची आज निवड झाली. पिठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे हे हया बैठकीच्या अध्यक्षस्थानी […]

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौर पदांचे आरक्षण जाहीर
•   १५ महानगरपालिकांमध्ये महिला होणार महापौर

Dio, दि. २२ :- राज्यातील २९ महानगरपालिकांमधील महापौर पदाची आरक्षणाची सोडत नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. पुढील अडीच वर्षांसाठी ही सोडत काढण्यात आली असून २९ महापालिकांपैकी १५ महापालिका विविध प्रवर्गातील महिलांसाठी […]

कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने
प्रारुप मतदार यादी तयार करण्याचे काम सुरु.

कोल्हापूर दि.३० : कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने प्रारुप मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू असून राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही यादी दि. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध होणार आहे. महानगरपालिकेकडून या कामासाठी […]

महापालिकेच्या गणेशोत्सवास उस्फुर्त प्रतिसाद, इराणी खणीमध्ये सावर्जनिक मंडळाच्या १५६१ व घरगुती व मंडळांच्या लहान १२०३ गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन..

कोल्हापूर ता.०७ :- महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने घरगुती व सार्वजनिक मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक करावा असे आवाहन करण्यात आले होते. यासाठी विसर्जनावेळी शहरात ठिकठिकाणी २२ महापालिकेच्यावतीने कृत्रिम विसर्जन कुंड ठेवण्यात आले होते. या उपक्रमाला कोल्हापूरकरांकडून उत्स्फूर्त […]

प्रामाणिक काम करणा-याच्या अधिका-याच्या पाठीवर प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांची शाब्बासकीची थाप

कोल्हापूर ता.1 : महापालिकेत प्रामाणिक व चांगले काम करणा-या अधिकारी व कर्मचा-यांच्या माठीमागे प्रशासक के.मंजूलक्ष्मी या कायम उभ्या असतात. याची प्रचित आज विभागीय कार्यालयातील एका निवृत्त होणाऱ्या अधिका-याला आली. राजारामपुरी विभागीय कार्यालयाचे उप-शहर अभियंता आर.के.पाटील […]

संधी मिळाल्यास विधानसभा लढवणार युवा नेते कृष्णराज महाडिक…

युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी पत्रकार परिषद घेऊन कोल्हापूर विकास कामासाठी राज्य शासनाकडून 25 कोटी विशेष निधी आणल्याचे सांगत आगामी विधानसभा निवडणूकीत संधी मिळाल्यास निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. कोल्हापूर शहरातील विविध प्रभागातील रस्ते डांबरीकरण, […]

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार, जलयुक्त शिवार, भूजल विभागाचा आढावा

कोल्हापूर : भूजल पुनर्भरण, जलशक्ती अभियान, माझी वसुंधरा अभियान, कॅच द रेन, जलयुक्त शिवार तसेच गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजना वेगवेगळ्या विभागामार्फत चालविण्यात येत आहेत. या योजनांमधील जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न […]

धोकादायक इमारतींवर कारवाई करा – प्रशासक के.मंजूलक्ष्मी

कोल्हापूर : पंचगंगा नदीची पाणी पातळी सतत वाढत असल्याने संभाव्य पूरस्थितीच्या पाश्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेने केलेल्या तयारीचा आढावा सोमवारी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी घेतला. यावेळी धोकादायक इमारतीवर कारवाई करण्याच्या सूचना प्रशासकांनी सर्व उपशहर अभियंता यांना दिल्या. तसेच […]

श्री केदारलिंग देवस्थान मूर्तीचे 7 ते 11 जुलै या कालावधीत संवर्धन
भाविकांना कासव चौकातून कलश व उत्सवमुर्तीच्या दर्शनाची सोय

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील मौजे वाडी रत्नागिरी येथील श्री केदारलिंग देवस्थान मूर्ती सुस्थितीत राहण्यासाठी सहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग, पुणे यांच्या वतीने श्री केदारलिंग देवाच्या मूर्तीचे संवर्धन दि. 7 ते 11 जुलै 2024 या कालावधीत करण्यात […]