आमदार प्रकाश आबिटकर यांच्या निधीतून गारगोटी येथील कोवीड सेंटर व ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय साहित्याचे वाटप

कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : कोरोना प्रादुर्भावाशी लढा देत असताना आमदार प्रकाश आबिटकर यांनी आपल्या निधीच्या माध्यमातून वैद्यकीय साहित्य खरेदी केले होते. त्याचा आज ग्रामीण रुग्णालय, गारगोटी येथे  लोकार्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  यामध्ये […]

बेरोजगार युवक-युवतींसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील लॉकडाऊनमुळे अनेक परप्रांतीय कामगारांचे स्थलांतर झाले आहे. आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता असल्यामुळे काही अटी व शर्तींच्या आधारे सुरू झालेल्या औद्योगिक आस्थापनांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. […]

“डॉ. बाबासाहेबांचे कार्य, विचारांवरील श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही” : उपमुख्यमंत्री अजित पवार

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ऐतिहासिक महत्वाच्या ‘राजगृह’ निवासस्थानी झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्ह असून हे समाजविघातक विकृत मानसिकतेचे दुष्कृत्य आहे. राज्य शासनाने घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलिसांनी […]

औद्योगिक वसाहतीत आयटी हबसाठी २०० एकर जागा राखीव ठेवा, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांची मागणी

कोल्हापूर प्रतिनिधी रवी जगताप : कागल- हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील दोनशे एकर जागा आयटी हबसाठी राखीव ठेवा, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना भेटून […]

सर्व मार्केटस् व दुकाने आता आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी : जिल्हाधिकारी चौधरी

सांगली प्रतिनिधी नजीर शेख  : सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीतील सर्व मार्केटस् व दुकाने यांना आठवड्यातील सर्व सात दिवस सकाळी ९ ते सांयकाळी ७ पर्यंत सुरू ठेवण्यास शासन निर्देशानुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी परवानगी दिली […]

समाजातील वंचित घटकांपर्यंत सर्व मूलभूत सुविधा पोहचविणार : आमदार चंद्रकांत जाधव

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : समाजातील तळागाळातील व्यक्तींपर्यंत सर्व मूलभूत सुविधा पोहचविण्यावर भर देण्यात येत असून, शहरातील सर्व पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज सांगितले. यादवनगर भागात प्रातिनिधिक स्वरूपात […]

मिरजेत कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू

मिरज प्रतिनिधी महेश नाईक : आज परत मिरजेतील प्रभाग क्रमांक ४ मधील मालगाव रोड, अमननगर रस्ता क्रमांक दोन येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला होता, परंतु आज त्याचा उपचाऱ्या दरम्यान मृत्यू झाला. त्या व्यक्तीच्या कुटुंबातील […]

जिल्ह्यात लॉकडाऊनचा कोणताही विचार नाही, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी

सांगली प्रतिनिधी संतोष कुरणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन  करण्याच्या अफवा काही समाजविघातक प्रवृत्तीकडून पसरविल्या जात आहेत. जिल्हाधिकारी चौधरी यांनी याची दखल घेत जिल्ह्यात लॉक डाऊन करण्याचा कोणताही विचार नसून, प्रशासन स्तरावर कोणतीही […]

शिवसैनिकांनी बांधले विज वितरण कार्यालयाला वाढीव बिलाचे तोरण

  गडमुडशिंगी प्रतिनिधी : गडमुडशिंगी, उंचगाव, वसगडे, सांगवडे, सरनोबतवाडीसह करवीर पूर्वभागातील सर्व गावातील वाढीव विज बिलाबाबत करवीर शिवसेनेच्यावतीने गडमुडशिंगी वीज वितरण कार्यालयाला वाढीव वीज बिलाचे तोरण बांधले. या आंदोलनात गडमुडशिंगीतील किराणा माल दुकानदार व्यापारी संघटनाही सहभागी […]

शेजारील जिल्ह्यात काम करणाऱ्या कामगारांना ये-जा करण्यास जारी केलेल्या परवानगीला ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये , म्हणून राज्य शासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत असून, राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३१ जुलै पर्यंत वाढविला आहे. सांगली जिल्ह्यात रहिवासी असलेले कामगार […]