करवीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने  जीवनगौरव व  करवीर भूषण पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी संतोष पवार

पत्रकार हे समाजप्रबोधनाचे विधायक व्यासपीठ असून पत्रकारांनी वृत्तमुल्यांशी निष्ठा ठेवून समाज हिताचे व्रत जोपासून 

Advertisements

जागल्याच्या भूमिकेतून गैरप्रवृती विरोधात 

आसूड ओढावेत असे परखड मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.जालिंदर पाटील यांनी व्यक्त केले 

  ते करवीर तालुका पत्रकार संघ व भोगावती महाविद्यालय यांच्या  संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार पुरस्कार, भेटवस्तू वाटप कार्यक्रमात  बोलत होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भोगावती  शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंग हुजरे हे होते. 

यावेळी प्रा.जालंदर पाटील पुढे  म्हणाले ग्रामीण भागातील पत्रकार अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम करत असून कोणत्याही अमिषाला बळी न पडता समाज हिताचे व्रत जोपासण्याचे काम करत आहेत 

    भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंग हुजरे म्हणाले ग्रामीण पत्रकार हा राजकीय यंत्रणेवर वचक ठेवून सामान्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करत आहे करवीर पत्रकार संघाने अशा पत्रकारांना पुरस्काररुपी प्रोत्साहनाने त्याचे मनोबल वाढवले आहे. 

    प्राचार्य दिनकर पाटील म्हणाले ग्रामीण भागातील पत्रकार समाजाला दिशादर्शक असून त्याची भूमिका प्रस्तापिताना विरोध करून सामान्यांना न्याय देण्याचे आहे

     यावेळी  ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर शिंदे यांचा सपत्नीक मानपत्र व सन्मानचिन्ह , फेटा व पुष्पगुच्छ देऊन  जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.तसेच मान्यवरांच्या  हस्ते पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या करवीर भूूूषण पत्रकार पुरस्काराने 

सुनील ठाणेकर (पुण्यनगरी), रमेश पाटील (लोकमत), उत्तम पाटील (पुढारी), राजेंद्र पाटील (सकाळ), प्रकाश जाखलेकर ( तरुण भारत),  जयवंत निगडे (फोटोग्राफर), कृष्णात निगडे(फोटोग्राफर) यांना  सन्मानित करण्यात आले.. 

यावेळी जीवन गौरव पुरस्कारप्राप्त प्रभाकर शिंदे सूनिल ठाणेकर, जयसिंग हुजरे, प्राचार्य दिनकर पाटील यांंनी आपल्या मनोगत व्यक केले 

कार्यक्रमास  भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश चौगले म्हाळुंगेकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक मेटील माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर, बबन रानगे, दत्तात्रय मेेेेडसिंगे, के. बी. पाटील, रणजित पाटील, युवराज पाटील, बबन पाटील,सचिन पाटील करवीर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गुणाजी नलवडे यांच्यासह परिसरातील मान्यवर व पत्रकार उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उत्तम पाटील यांनी केले तर आभार प्रा. एस.पी.चौगले यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *