बहिरेवाडी ग्रामस्थांचे पांग फेडण्याचे भाग्य मला मिळाले:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची कृतज्ञता…!

कोल्हापूर/प्रतिनिधी: बहिरेवाडी ता. आजरा या गावाला पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचे दुर्भिक्ष. पिण्याच्या पाण्यासाठी येथील माता-भगिनीची चाललेली वणवण मला अस्वस्थ करायची. या गावानेही माझी नेहमीच हिमालयासारखी पाठराखण केली आहे. या गावाला पिण्याच्या पाण्यासाठी महत्वकांशी योजना मंजूर […]

मराठा समाजासाठी स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग,मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई/प्रतिनिधी दि. २५ : मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी तातडीने स्वतंत्र समर्पित मागासवर्ग आयोग गठित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी काल झालेल्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत हा […]

सारथीच्या योजनांच्या व्यापक प्रसिद्धीस समाज माध्यांचाही वापर करा : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी दि. २५: सारथीमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची व्यापक जनजागृती करण्यासाठी सारथीने समाज माध्यमांचाही वापर करावा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे दिल्या. सारथी योजनेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना व सुरु असलेल्या कामांबाबत पालकमंत्री सतेज […]

खेळाडूंनी खिलाडूवृत्ती जोपासावी : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर/प्रतिनिधी दि. २५ : विविध क्रीडा स्पर्धांतून खेळाडूंच्या मानसिकतेचा कस लागतो. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर खेळाचे महत्व अनन्य साधारण आहे. खेळाडूंनी जय-पराजयाचा विचार न करता खिलाडूवृत्ती जोपासावी, असे आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. […]

दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ सामना बरोबरीत…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन सीनियर गट साखळी फुटबॉल स्पर्धा २०२१-२२ आजचा सामना पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ अ यांच्यात  खेळवला गेला पूर्ण वेळेत सामना १-१ बरोबरीत राहिला.  सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघानी आक्रमक […]

युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत केंद्राशी समन्वय ठेवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुंबई/प्रतिनिधी,दि २४:  युक्रेनमधील युद्ध परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील जे नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत त्यांची तिथे काय व्यवस्था आहे ते पाहण्याच्या तसेच त्यांना परत महाराष्ट्रात सुखरूप घेऊन येण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी व्यवस्थित समन्वय साधावा, विशेषत: महाराष्ट्रातील जे विद्यार्थी […]

२७ फेब्रुवारीची पल्स पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वी करुया : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

रविना पाटील, कोल्हापूर/प्रतिनिधी, दि. २४ : पोलिओ निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शून्य ते पाच वयोगटातील सर्व बालकांना रविवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी पोलिओ डोस देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व बालकांना पोलिओ डोस मिळाल्याची खात्री करण्यासाठी […]

युजर्सना सुरक्षित,ठेवणारे व्हॉट्सॲप चे ‘Safety in India’ भारतात लाँच… 

Media Control Online WhatsApp ने एक समर्पित WhatsApp ‘सेफ्टी इन इंडिया’ रिसोर्स हब लाँच केले आहे. जे लोकांना ऑनलाइन सुरक्षित राहण्यास मदत करण्यासाठी विविध सुरक्षा उपायांची रूपरेषा देते. इंटरनेटच्या सुरक्षित वापराला चालना देण्यासाठी WhatsApp च्या […]

उचंगी प्रकल्पाच्या घळभरणी परिसरात 144 कलम लागू जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश

कोल्हापूर/प्रतिनिधी दि. 22: उचंगी लाभक्षेत्रातील लोकांनी त्यांच्या पुनर्वसन मागणी संदर्भात वेळोवेळी मोर्चे, धरणे आंदोलने, उपोषणे, ठिय्या आंदोलने करुन धरणाचे कामकाज वेळोवेळी बंद पाडलेले आहे. उचंगी प्रकल्पाच्या घळभरणी परिसरात धरणाचे कामकाज बंद करुन येथील यंत्रसामुग्रीचे नुकसान व […]

खाद्यतेल व तेलबियांच्या साठवणुकीवर निर्बंध लागू

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि. २२ : राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर खाद्यतेलाच्या किंमतीमध्ये वाढ झाली असल्यामुळे सर्व खाद्यतेल व तेलबियांच्या साठवणुकीवर ३० जून २०२२ पर्यंत साठा निर्बंध लागू करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या […]