भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त मंत्रालयात मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण…!

मुंबई : महाराष्ट्राला देशात अग्रेसर राज्य बनविण्याच्या दिशेने आपण आता वाटचाल सुरू केली आहे. आपण सर्वजण मिळून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशाला आणि राज्याला प्रगतीपथावर नेण्याची शपथ घेऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. […]

महानगरपालिकेच्यावतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहन

कोल्हापूर :- स्वातंत्र्य दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार, दि.१५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ८.१५ वाजता महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन […]

भीषण अपघातात शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे निधन….!

मुंबई : शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांचं कार अपघातात निधन झालं आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ विनायक मेटे यांच्या वाहनाला पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास अपघात झाला होता. या अपघातात मेटे […]

चंद्रकांत पाटील कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारणार…?

कोल्हापूर : पुण्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वीकारणार असल्याचे सूतोवाच खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच केले होते. मात्र, वक्तव्य करून ‘यू टर्न’ घेण्याची परंपरा असणारे पाटील आता कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारणार असल्याची […]

१८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार ‘टकाटक २’

कोल्हापूर : बॅाक्स ऑफिसवर मिळवलेलं यश आणि प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलेल्या स्थानाच्या बळावर ‘टकाटक’ चित्रपटाचा पुढील भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हसत-खेळत प्रेक्षकांपर्यंत संवेदनशील विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘टकाटक’चा पुढील भाग ‘टकाटक २’ या नावाने […]

पंचगंगा नदीची वाटचाल धोका पातळीकडे…! सकाळी १० वाजेपर्यंत राजाराम बंधारा पाणी पातळी ४० फुटांवर…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. राधानगरी पाणलोट क्षेत्रासह आजारा, गगनबावडा परिसरात पावसाने थैमान घातलं आहे. परिणामी राधानगरी धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होऊ लागली असून धरण […]

Weather Updates: शिवाजी विद्यापीठच्या परीक्षा स्थगित…!

कोल्हापूर : कोल्हापूर सांगली आणि सातारा या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे शिवाजी विद्यापीठाच्या दिनांक १० व ११ ऑगस्ट २०२२ रोजीच्या आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा स्थगित करण्यात येत आहेत. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर […]

चंद्रकांतदादा पाटील यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झालेबद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीने आनंदोत्सव साजरा

कोल्हापूर दि ९ : भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचा महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदाचा शपथविधी आज सकाळी ११ वाजता संपन्न होताच भाजपा कोल्हापूरच्या वतीने छ. शिवाजी महाराज चौक या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटून […]

Weather Updates: चिखली येथील लोकांना प्रशासना कडून स्थलांतरीत होण्याच्या सूचना …

कोल्हापूर: जिल्ह्यात सूरू आसलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगेचे पाणी इशारा पातळी ओलांडून पुढे आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना वेळेत स्थलांतरीत होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  कोल्हापूर शहरातील चिखली ता करवीर येथील नागरिकांना पाणी पातळी वाढत असल्याने […]

राजाराम बंधारा पाणी पातळी सकाळी ९ वाजता ३६ फुटांवर… राधानगरीचे दरवाजे उघडणार… कोल्हापूर वर पुराचे सावट..!

कोल्हापूर : राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असताना कोल्हापुरातही पाऊसाची संतधार सुरूच आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी पाणी पातळीत वाढ सुरूच आहे. सकाळी ८:०० वाजता पंचगंगा पाणी पातळी ३६ फूट ७ इंचावर पोहोचली आहे. […]